स.न.वि.वि.,
1) श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांची विनामूल्य समाजकार्य करण्याची कार्यपद्धतः
माझी कोणतीही संस्था नाही. मला कोणी मदतनिस नाही. मी स्वतः इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकुर टाईप करुन ईमेल पाठवतो व आलेल्या ईमेलना उत्तरे देतो. तसेच आलेली माहिती जतन करतो. माझा ब्लॉग आहे तो मी लिहतो. समाजाशी बांधिलकी व छंद म्हणून समाजकार्य करतो. मला मासिक पेन्शन रु. ७२२/- आहे. कॉमप्युटर व मोबाईल इंटरनेट जोडणीसाठी अनुक्रमे रु. ६६८/- व रु. १७५/- दरमहा खर्च होतात. समाजकार्यासाठी लाखो करोडो रुपयाची गरज लागत नाही. समाजकार्यासाठी आजतागायत मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत व आजन्म घेणार नाही.
2) श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांच्या इंटरनेटच्या माध्यमातुन विनामूल्य वधु वर शोधाचे फायदेः
१) लिखित अचुक माहिती घरबसल्या त्वरित मिळते.
२) दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस व वर्षाचे ३६५ दिवस कोठूनही व कधिही बायोडेटा व फोटो ईमेल करता येते व प्रप्त करता येतो.
३) यासाठी प्रवासखर्च, वेळेचा व्यय व शारिरीक दगदग होत नाही.
४) माहिती त्वरित ३-४ दिवसात सर्क्युलेट केली जाते.
५) बायोडेटा व फोटो पाठवण्यासाठी लागणारा पोस्टेज/कोरियर खर्च वाचतो.
६) ईमेलद्वारे मिळालेला बायोडेटा व फोटो कुटूंबातील व अन्य ठिकाणी राहणारे नातेवाईक पाहून चर्चा करुन, पत्रिका पाहून, व अन्य प्राथमिक बाबी तपासुन पुढे पाऊल टाकू शकतात.
७) ईमेलद्वारे केलेला पत्रव्यवहार व दिली-घेतलेली माहिती, सायबर कायद्या अंतर्गत संरक्षित असते व गैरवापर करणारी व्यक्ति ताबडतोब पकडली जाते.
८) खेड्यापाड्यात व जगाच्या कानाकोपरयात राहणारया लोकांना याचा लाभ मिळतो.
९) या कामासाठी व्यक्तिशहा भेटण्याची गरज नाही त्यामुळे शारिरीक दगदग, प्रवास खर्च व रजा इत्यादि वाचते.
ता.क. - १) ईच्छुकांनी ईमेल आयडी : vilassocialwork@gmail.com , मोबाईल नं. +919869388303 व व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आपले पूर्ण नांव, पिनकोडसह पत्ता, मोबाईल नं. व ईमेल आयडी पाठवावा जेणेकरुन विहित फॉर्म त्वरित ईमेलद्वारे पाठवता येईल.
२) ही पोस्ट सर्व नातेवाईक व ग्रुपनां पाठवावी.