शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

DATE: 23-09-16: FROM MR SUNIL KAILAS KAMBLE, CHEMBUR, MUMBAI:

 वाचा. अनेकांचे गैरसमज दुर होतील.

🎯 *_अॅट्रोसीटी कायद्याचे काही कळते तरी काय ?_*                    

📋✍🏻 *अनिल वैद्य*
            *माजी न्यायाधीश*

👉 अॅट्रोसीटी कायदा रद्द करा, म्हणणाऱ्यांना कायदा तरी कळतो काय ? हा कायदा का केला हे ह्यांना माहीती तरी आहे काय ?
👉 संविधानाने  कलम १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केली, ही तरतूद आहे. या तरतुदीचे पालन केले नाही तर उपाय योजना म्हणून हा कायदा केला.
👉 संविधानात कलम १५ ने जात, धर्म या आधारे सरकारला कुणाशी भेद करता येत नाही, कुणाला जाती, धर्माच्या कारणाने सार्वजनिक स्थळी, हॉटेल, विहीर, शाळा ईत्यादी स्थळी प्रवेश नाकारता येत नाही. अशी तरतूद केली आहे.
👉 या संविधानिक तरतुदीचा भंग केला तर त्याला शिक्षा म्हणून अॅट्रॉसीटी कायदा केला आहे.
👉 जो पर्यंत संविधानात कलम १७,  कलम १५ आहेत तो पर्यंत हा कायदा रद्द होऊ शकत नाही. या कायद्याचे मूळ संविधानात आह, हे तरी कळते काय ?
👉 आधी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ ला आला. तो आजही लागु आहे. परंतु त्यातील तरतुदी अत्याचाराचा प्रतिबंध करण्यास पुरेशा नसल्याने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मध्ये करण्यात आला. तो ३०/१/1990 पासून लागु झाला.
👉 त्या नंतर तरी जातीय अत्याचारास प्रतिबंध झाला का ?
नाही ...
👉 त्या नंतरच नागपूरचे मनोरमा कांबळे हत्या प्रकरण घडले. आरोपी  निर्दोष सुटले.
👉 खैरलांजी प्रकरणात आरोपींना भा. द. वी. अंतर्गत शीक्षा झाली. परंतु अॅट्रोसीटी कायद्या मधून निर्दोष सोडलं.
👉 या कायद्याने आरोपीला शिक्षा जर होत नसेल, याचा अर्थ हाच की हा कायदा योग्य प्रकारे राबविल्या जात नाही.
👉 पोलीस स्टेशनला अॅट्रोसीटीची तक्रार, मोर्चा नेल्या शिवाय नोंदविली जात नाही. शिक्षा तर 3 टक्के ही नाही.
👉 विविध ऊच्च न्यायालायाचे असे काही निर्णय आहेत की आरोपीलाच फायदा होईल. आज पर्यंत या कायद्या अंतर्गत समित्या स्थापन केल्या नाहित, अनुसूचित जाती आयोगाने कधी कुणाला धारेवर धरले नाही, असे असतांना या कायद्याचा दुरुपयोग केला जातॊ अशी ओरड करणाऱ्यांना कायदा तरी कळतो काय ?
👉 मी यांना विचारतो, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होत नाही काय ? कोणत्या कायद्याचा दुरुपयोग केला जात नाही ? जवळ जवळ सर्वच कायद्याचा दुरुपयोग केला जातो. भा. द. वी. चा सुध्दा लोक दुरुपयोग करतात. मग भा. द. वी. रद्द करणार काय ?

📋✒ *अनिल वैद्य, माजी न्यायाधीश*
       🔸 *_बुद्ध धम्म अनुसरण संघ ®_*🔸