शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

नोकरीच्या संधी

कृपया खालील लिंक पहाः
http://www.mahanews.gov.in/HOME/NaukriShodhaNewsDetails.aspx?str=0ur4SZfbPVM=


'डाएट'ची सप्तसूत्री

रोज जिममध्ये घाम गाळूनही वजन कमी होत नाही? मग तुमच्या डाएटमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये कसा बदल करता येईल हे सांगणाऱ्या या सात महत्त्वाच्या गोष्टी.
जिममध्ये जाण्याचा आनंद दुप्पट होतो, जेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना जाणवू लागतात. पण अनेकदा असे होते की जिममध्ये नियमितपणे व्यायाम करूनही त्याचे काही परिणाम दिसत नाहीत. म्हणजे जिम लावल्यावर काही दिवसातच जवळच्या लोकांकडून पॉझिटिव्ह रिअॅक्शन येत नाही. वेट लॉस आणि इंच लॉस काहीच आपल्याला जाणवत नाही. असे झाले की मग व्यायाम करण्याचा उत्साह उतरणीला लागतो आणि जिम एक कंटाळवाणी गोष्ट वाटू लागते. जर हे तुमच्या किंवा तुमच्या मित्रांबरोबरही झाले असेल तर..
सर्वप्रथम, आपले ट्रेिनग तपासून पाहा. आठवडय़ातून ४ ते ५ वेळा जिमला नियमितपणे जाऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच ट्रेिनग करत असताना काíडओ आणि स्ट्रेन्थ ट्रेिनग देणारा व्यायाम यांचे मिश्रण करून शरीराला योग्य आराम मिळेल याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर या सर्व गोष्टी योग्यप्रकारे पाळल्या जात असतील, तर तुमच्या डाएटमध्ये काहीसे बदल करण्याची आवश्यकता आहे.
व्यायाम करणाऱ्यांसाठी योग्य डाएटची सप्तसूत्री.. अर्थात काही टिप्स
१. पहिल्यांदा, आपल्या डाएटमध्ये काय कमतरता आहे हे समजून घ्या. जर एखादी व्यक्ती एक तास व्यायाम करते आणि हाय कॅलरीचे पदार्थ खाते तर शरीरात साठवलेले फॅट कमी होणे अवघड होते. साहजिकच अशा व्यक्तीचे वजन कमी होत नाही.
२. प्रोटिन्स किती प्रमाणात घेतले जातात हे पाहणे गरजेचे आहे. व्यायामाला सुरुवात केलेल्या व्यक्तीला १.५ ग्रॅम ते १.८ ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते तर नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला १.८ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रोटिन्स गरजेचे असतात. अंडय़ातील पांढरा भाग, व्हे प्रोटिन, चिकन, मासे, दुधाचे पदार्थ हे प्रोटिन्सचे चांगले स्रोत आहेत. व्यायामानंतर शरीराची हानी भरून काढण्यासाठी व्यायाम करणाऱ्याच्या वजनाचा विचार करता प्रतिकिलो १ ग्रॅम प्रोटिन्सचे सेवन केले नाही तर मसल लॉस होण्याचा धोका असतो.
३. फायब्रस काबरेहायड्रेट्स (उदाहरणार्थ आर्टचिोक, ब्रोकोली, रासबेरी, व्होल ग्रेन) आणि प्रोटिन्स (उदाहरणार्थ मासे, अंडय़ाचा पांढरा भाग, दही, अक्रोड इत्यादी) यांचा आहारात समावेश केला तर वजन किंवा चरबी कमी करण्यास ते फायदेशीर ठरतात. कारण त्यामुळे चयापचय वाढते. त्यामुळे पचनादरम्यान कॅलरींचे विघटन होण्यास मदत होते.
४.  अक्रोड, फ्लाक्ससीड आणि माशांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटमुळेही चयापचयात वाढ होते.
५. पाचवी गोष्ट म्हणजे, शरीरातील पाण्याची पातळीही महत्त्वाची ठरते कारण डिहायड्रेट झालेले शरीर फॅट कमी करू शकत नाही तसेच मसल्स वाढवू शकत नाहीत. शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर व्यायामाचा शरीरावर फारसा परिणाम जाणवत नाही. दिवसाला किमान २ ते ३ लिटर पाणी न चुकता प्यायला हवे.
६. आपल्या डाएट बाहेर जाऊन आपण किती वेळा इतर पदार्थ खातो यावरही लक्ष ठेवले तरी फायदा होतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर अतिरिक्त व्यायाम केला तर या पदार्थानी होणारे नुकसान भरून काढता येऊ शकते.
७. अखेरचे म्हणजे, केवळ वजनाकडे पाहून आपले शरीर योग्य प्रमाणात आहे की नाही हे ताडणे चुकीचे आहे. मसल्स वाढल्याने वजन वाढते. या वाढणाऱ्या वजनामुळेही अनेकजण चिंता करतात पण ते योग्य नाही. चोख डाएट आणि उत्तरोत्तर वाढणारा व्यायाम तुमच्यात अपेक्षित बदल घडवू शकतात. 
जान्हवी चितलिया -  viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट असून वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)

कृपया खालील लिंक पहाः
http://www.loksatta.com/viva-news/best-diet-for-weight-loss-1068617/

आर टी ओ अंतरंग : ड्रायव्हिंग लायसन्स

ड्रायव्हिंग लायसन्स पूर्ण देशांतर्गत चालते. तुमचे लर्निंग लायसन्स काढून तीस दिवस पूर्ण झाल्यावरच तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. 
* ड्रायव्हिंग टेस्टसाठी www. sarathi. nic.in या वेबसाइटवरून अपॉइंटमेंट घेणे गरजेचे असते. 
* ड्रायव्हिंग टेस्टसाठी वाहनाची व्यवस्था आपण करायची असते. वाहनाची विधिग्राह्य़ कागदपत्रे मूळ प्रती दाखवणे आवश्यक आहे. दुचाकी वाहनाची टेस्ट देताना योग्य बी. एस. स्टँडर्डचे हेल्मेट पट्टा बांधलेल्या स्थितीत परिधान केलेले असावे. 
* दुचाकी वाहनाची टेस्ट साधारण तीस मीटर लांबीच्या इंग्रजी आठ आकाराच्या आकृतीवर घेण्यात येते. या टेस्टमध्ये, उजवीकडे वळणे, डावीकडे वळणे, वेग कमी करणे, वाहन थांबवण्यासाठी इशारा करणे यासाठी उमेदवार हाताने खुणा योग्य रीतीने करतो का, हे तपासले जाते. टेस्ट देताना जमिनीवर पाय टेकल्यास गुण वजा केले जातात, तसेच ट्रॅकच्या कडेच्या खांबावर स्पर्श होऊन खांब पडल्यास गुण वजा केले जातात. 
* बारामती येथील प्रा. प. कार्यालयात सदर टेस्ट संगणकीय टेस्टिंग ट्रॅकवर घेतली जाते. 
लायसन्सची टेस्ट झाल्यावर निरीक्षक त्या फॉर्मवर सही करतात. त्यानंतर सदर फॉर्मवर स.प्रा.प.अधिकारी सही करतात, त्यानंतर फॉर्म लायसेन्स सेक्शनला जातो. तेथे डाटा एन्ट्री होते. ती डाटा एन्ट्री अॅप्रूव्ह केली जाते. त्यानंतर लायसेन्स पिंट्र केले जाते. पिंट्र केलेले लायसेन्स व नाव-पत्ता यादी पोस्टाच्या कर्मचारी यांच्याकडे दिला जातो. पोस्टाद्वारे लायसेन्स घरपोच येते. लायसन्स वेळेवर न मिळल्यावर ई-मेलने तक्रार करावी.
संजय डोळे - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

कृपया खालील लिंक पहाः
http://www.loksatta.com/drive-it-news/driving-license-1068686/

कसा असावा रेझ्युमे?

नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही सादर केलेला रेझ्युमे अर्थात बायोडेटा याचे महत्त्व मोठे असते. रेझ्युमे हा जणू तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच आरसा असतो. रेझ्युमे तयार करताना कुठल्या गोष्टींचे भान राखणे आवश्यक असते, याची माहिती..
कृपया खालील लिंक पहाः
http://www.loksatta.com/kg-to-college-news/how-will-be-your-resume-1058930/

इंग्रजी वाचन वाढविण्यासाठी..

केवळ अक्षरे व शब्द वाचता येणे म्हणजे वाचन नव्हे. तसे असते तर इंग्रजी लेख किंवा पुस्तक पाहताच 'छे, इतके लांबलचक इंग्रजीमध्ये कसे वाचणार? अशी आपली प्रतिक्रिया झाली नसती. आपण अनेकदा उत्तम इंग्रजी पुस्तके विकत घेतो; शेक्सपीयर, शॉ, वर्ड्सवर्थ मूळ इंग्रजीतून वाचायची इच्छा असते, पण प्रत्यक्षात मात्र काही पानांपलीकडे वाचन होत नाही. इंटरनेट क्रांतीमुळे वाचनासाठी जगभरातील उत्तम साहित्य आणि भरपूर माहिती सहज उपलब्ध झाली आहे. त्याच वेळी वाचनाची सवय मात्र कमी होताना दिसते.
'मला इंग्रजी वाचन वाढवायला हवे, मी काय वाचू?' असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचनाची सुरुवात आपल्या आवडीच्या विषयावरील सोप्या लेखनाने करा. थेट शेक्सपीयर वाचण्यापूर्वी 'चार्ल्स अ‍ॅण्ड मेरी लॅम्ब'ने लिहिलेले 'टेल्स फ्रॉम शेक्सपीअर' वाचा. इंग्रजी वृत्तपत्रे, ब्लॉग्स किंवा नियतकालिके नियमित वाचा. काही दिवसांनी वाचनाची सवय जडेल आणि गोडी निर्माण होईल. मग मात्र अधिकाधिक क्रमाने कठीण वाटणारे साहित्य वाचायला सुरुवात करा. सहज समजेल अशी भाषा वाचण्याऐवजी समजून घ्यायला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल असे साहित्य निवडा. अशा प्रकारे वाचनाची श्रेणी हळूहळू पण सतत वाढविल्यास तुम्ही लवकरच उत्तम इंग्रजी सहज वाचू लागाल.
संदर्भातून शब्दार्थ ओळखा. इंग्रजी वाचताना अनेकदा आपल्याला नवीन शब्द अडतात. अर्थ शोधण्यासाठी वारंवार शब्दकोश उघडावा तर वाचनात खंड पडतो. वाचताना अनोळखी शब्द आढळल्यास मागील व पुढील वाक्याचा संदर्भ घेऊन अर्थाचा अंदाज बांधा. उदा. The debris on the floor included empty bottles, old newspapers and chocolate wrappers. हे वाक्य वाचून kdebrisl चा अर्थ 'कचरा' किंवा 'टाकाऊ वस्तू' आहे असा अंदाज बांधता येईल.
Being short of cash, he ate a frugal meal. frugal चा अर्थ 'स्वस्तातले' किंवा 'कमी खर्चीक' असा गृहीत धरायला हरकत नाही. संपूर्ण लेख वाचून झाल्यावर शब्दकोश वापरून आपले अंदाज पडताळून पाहायला मात्र विसरू नका.

वाचनकौशल्य जोपासा

वाचन ही नुसती आवड नसून कामाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक असे कौशल्य आहे. कार्यक्षम वाचक दिवसभरात समोर येणारी अनेक ई-मेल्स, अहवाल व पत्रव्यवहार पटकन समजून घेऊन कार्यान्वित करू शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा- विशेषत: कला शाखेमध्ये शिकणारे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वाचनकौशल्य संपादन करून कमी वेळात अधिक प्रभावी रीतीने अभ्यास करू शकतात. वाचनप्रक्रियेत येणाऱ्या सामान्य अडचणी म्हणजे वाचनाचा कंटाळा येतो, काही पाने वाचली की लक्ष विचलित होते, एकाग्र मनाने वाचता येत नाही, कठीण शब्द सतत अडतात, लांबलचक वाक्ये पटकन समजत नाहीत. उत्तम वाचनकौशल्ये ही काही ईश्वरी किंवा नसíगक देणगी नव्हे. योग्य मार्गाने सतत सराव करून कोणीही कार्यक्षम वाचक बनू शकतो. वाचनकौशल्ये आत्मसात केल्यास वरील अडचणींवरही सहज मात करता येईल. वाचनक्षमता वाढवण्यासाठी तसेच कार्यक्षम वाचक बनण्यासाठी 'सक्रिय वाचन' किंवा 'सहभागात्मक वाचना'चे तंत्र वापरून पाहा. कसे कराल सक्रिय अथवा सहभागात्मक वाचन?
कृपया खालील लिंक पहाः

http://www.loksatta.com/learn-it-news/increase-your-reading-skills-1067960/