ड्रायव्हिंग
लायसन्स पूर्ण देशांतर्गत चालते. तुमचे लर्निंग लायसन्स काढून तीस दिवस पूर्ण
झाल्यावरच तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता.
* ड्रायव्हिंग टेस्टसाठी www. sarathi. nic.in या वेबसाइटवरून अपॉइंटमेंट घेणे गरजेचे असते.
* ड्रायव्हिंग टेस्टसाठी वाहनाची व्यवस्था आपण करायची असते. वाहनाची
विधिग्राह्य़ कागदपत्रे मूळ प्रती दाखवणे आवश्यक आहे. दुचाकी वाहनाची टेस्ट देताना
योग्य बी. एस. स्टँडर्डचे हेल्मेट पट्टा बांधलेल्या स्थितीत परिधान केलेले असावे.
* दुचाकी वाहनाची टेस्ट साधारण तीस मीटर लांबीच्या इंग्रजी आठ आकाराच्या
आकृतीवर घेण्यात येते. या टेस्टमध्ये, उजवीकडे वळणे, डावीकडे वळणे, वेग कमी करणे, वाहन
थांबवण्यासाठी इशारा करणे यासाठी उमेदवार हाताने खुणा योग्य रीतीने करतो का,
हे तपासले जाते. टेस्ट देताना जमिनीवर पाय टेकल्यास गुण वजा केले
जातात, तसेच ट्रॅकच्या कडेच्या खांबावर स्पर्श होऊन खांब
पडल्यास गुण वजा केले जातात.
* बारामती येथील प्रा. प. कार्यालयात सदर टेस्ट संगणकीय टेस्टिंग
ट्रॅकवर घेतली जाते.
* लायसन्सची टेस्ट झाल्यावर निरीक्षक त्या फॉर्मवर सही करतात.
त्यानंतर सदर फॉर्मवर स.प्रा.प.अधिकारी सही करतात, त्यानंतर
फॉर्म लायसेन्स सेक्शनला जातो. तेथे डाटा एन्ट्री होते. ती डाटा एन्ट्री अॅप्रूव्ह
केली जाते. त्यानंतर लायसेन्स पिंट्र केले जाते. पिंट्र केलेले लायसेन्स व
नाव-पत्ता यादी पोस्टाच्या कर्मचारी यांच्याकडे दिला जातो. पोस्टाद्वारे लायसेन्स
घरपोच येते. लायसन्स वेळेवर न मिळल्यावर ई-मेलने तक्रार करावी.
संजय डोळे - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
कृपया खालील
लिंक पहाः
http://www.loksatta.com/drive-it-news/driving-license-1068686/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा