केवळ अक्षरे व शब्द वाचता येणे म्हणजे वाचन
नव्हे. तसे असते तर इंग्रजी लेख किंवा पुस्तक पाहताच 'छे, इतके लांबलचक
इंग्रजीमध्ये कसे वाचणार? अशी आपली प्रतिक्रिया झाली नसती. आपण अनेकदा
उत्तम इंग्रजी पुस्तके विकत घेतो;
शेक्सपीयर, शॉ, वर्ड्सवर्थ मूळ इंग्रजीतून वाचायची इच्छा
असते, पण प्रत्यक्षात मात्र काही पानांपलीकडे वाचन होत नाही. इंटरनेट
क्रांतीमुळे वाचनासाठी जगभरातील उत्तम साहित्य आणि भरपूर माहिती सहज उपलब्ध झाली
आहे. त्याच वेळी वाचनाची सवय मात्र कमी होताना दिसते.
'मला इंग्रजी वाचन वाढवायला हवे, मी काय वाचू?' असा प्रश्न अनेकांना
पडतो. वाचनाची सुरुवात आपल्या आवडीच्या विषयावरील सोप्या लेखनाने करा. थेट
शेक्सपीयर वाचण्यापूर्वी 'चार्ल्स अॅण्ड मेरी लॅम्ब'ने लिहिलेले 'टेल्स फ्रॉम
शेक्सपीअर' वाचा. इंग्रजी वृत्तपत्रे, ब्लॉग्स किंवा नियतकालिके नियमित वाचा.
काही दिवसांनी वाचनाची सवय जडेल आणि गोडी निर्माण होईल. मग मात्र अधिकाधिक क्रमाने
कठीण वाटणारे साहित्य वाचायला सुरुवात करा. सहज समजेल अशी भाषा वाचण्याऐवजी समजून
घ्यायला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल असे साहित्य निवडा. अशा प्रकारे वाचनाची श्रेणी
हळूहळू पण सतत वाढविल्यास तुम्ही लवकरच उत्तम इंग्रजी सहज वाचू लागाल.
संदर्भातून शब्दार्थ ओळखा. इंग्रजी वाचताना
अनेकदा आपल्याला नवीन शब्द अडतात. अर्थ शोधण्यासाठी वारंवार शब्दकोश उघडावा तर
वाचनात खंड पडतो. वाचताना अनोळखी शब्द आढळल्यास मागील व पुढील वाक्याचा संदर्भ
घेऊन अर्थाचा अंदाज बांधा. उदा. The
debris on the floor included empty bottles, old newspapers and chocolate
wrappers. हे वाक्य वाचून kdebrisl चा अर्थ 'कचरा' किंवा 'टाकाऊ वस्तू' आहे असा अंदाज
बांधता येईल.
Being short of cash, he ate a frugal meal. frugal चा अर्थ 'स्वस्तातले' किंवा 'कमी खर्चीक' असा गृहीत धरायला हरकत नाही. संपूर्ण लेख
वाचून झाल्यावर शब्दकोश वापरून आपले अंदाज पडताळून पाहायला मात्र विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा