बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

                अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे
दिनांक: 14-09-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई यांचे कडून:

स. न. वि. वि. ,

मी मानवी जीवनाला कलाटणी देणार्‍या खालील बाबींसाठी सर्व समाजाच्या लोकांसाठी विनामूल्य काम करतो हे आपणास माहित आहे.
1) करिअर मार्गदर्शन
2) सर्व प्रकारच्या नोकर्यांच्या उपलब्धतेची माहिती
3) वधु वर शोध
या मध्ये आणखीन एका बाबीचा समावेश करणे आवश्यक आहे असे मला वाटते व ती म्हणजे जीवन विमा कवच. मानवी जीवनाची अनिश्चितता असल्यामुळे कुटुंबाच्या भल्यासाठी  प्रत्येक स्त्री पुरुषाने पहिल्या पगारापासुन/व्यवसायातील नफ्यापासुन जीवन विमा पाॅलिसी घेतली पाहिजे.
या संदर्भात आपल्या भारत देशामध्ये द इन्श्युरन्स अॅक्ट, 1938 लागु करण्यात आला असून त्यामध्ये परिस्थिती अनुरूप दुरुस्त्या करुन खाजगीकरण व वैश्विकरण धोरणानुसार भारतीय विमा कंपन्यांचे 51% भाग भांडवल  व परदेशी कंपन्यांचे 49% भागभांडवल याला परवानगी देण्यात आली आहे. सर्व इन्स्युरन्स कंपन्यांवर चोख देखरेख ठेवण्यासाठी, त्यांचे नियमन करण्यासाठी व ग्राहकांचे हित जपण्यासाठी; Insurance Regulatory & Development Authority of India(IRDAI) या वैधानिक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
आजमितीला भारतामध्ये एकुण 24 जीवन विमा कंपन्या कार्यरत असून यापैकी 23 खाजगी व एक सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसी कार्यरत आहेत. अमेरिका देशाची लोकसंख्या आपल्या भारत देशापेक्षा कमी असून तेथे 2400 विमा कंपन्या कार्यरत आहेत. तसेच आजमितीस भारत देशामध्ये 50% लोकांनी जीवन विमा कवच घेतले आहे व अमेरिकेत याचे प्रमाण 100% आहे. आपल्या देशामध्ये विम्याबाबत म्हणावी तशी जागृती नाही.
वरील बाबी लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी जीवन विमा कवच घेतले पाहिजे असे मला वाटते.
सहज पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत.
प्रश्न क्र. 1 - जीवन विम्याचा फायदा काय?
उत्तर - कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक अकली मृत्यू झाल्यास नाॅमीनीस/कायदेशीर वारसास विम्याची पूर्ण रक्कम मिळते. अन्यथा मॅच्युरिटी रक्कम व बोनस मिळतो. दोन्ही प्रकारच्या रकमांवर कोणताही कर द्यावा लागत नाही.
प्रश्न क्र. 2 - विमा कंपन्या कशा चालतात व त्यांना पैसे कोठून मिळतात?
उत्तर - मृत्यू दर व अन्य बाबींचा विचार करून विम्याचा प्रिमियम ठरवून अनेक विमाधारकाकडून प्रिमियम घेऊन संखेने कमी असणाऱ्या मृतांच्या वारसांना तो दिला जातो.
प्रश्न क्र. 3 - तक्रार निवारण कोण व कसे करते?
उत्तर -  वेगवेगळ्या टप्यावर वेगवेगळ्या अॅथाॅरिटी तक्रार निवारण करतात. शिवाय Consumer Protection Act, 1986 अंतर्गतही न्याय मागता येतो.
प्रश्न क्र. 4 - जीवन विमा कवचाची रक्कम कशी ठरवतात?
उत्तर - विमा घेणार्‍या व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून त्याला स्वतःला लागणारा खर्च वजा करुन येणाऱ्या रकमेवर योग्य तो व्याजदर उदा. 8% द. सा. द. शे. मिळवून येणारी रक्कम ही विमा रक्कम म्हणून ठरवली जाते. या रकमेला ह्युमन लाईफ व्हॅल्यू(HLV) असे म्हणतात.
प्रश्न क्र. 5 - विमा कोणत्या कंपनीकडून घ्यावा?
उत्तर - कोणत्याही चांगली सेवा देणाऱ्या नोंदणीकृत विमा कंपनीकडून. स्पर्धेमुळे ग्राहकांच्या सेवेमध्ये सुधारणा होत आहे.
प्रश्न क्र. 6 - विमा कंपनी बंद पडलीतर? 
उत्तर - कायद्याप्रमाणे ती बंद करता येत नाही. विमाधारकाचे हित जपत ती अन्य विमा कंपनीमध्ये विलीन केली जाते.
प्रश्न क्र. 7 - विमा कोणाकडून घ्यावा?
उत्तर - परवानाधारक विमा एजंटकडून ज्यांना संबंधित विमा कंपनीकडून प्रशिक्षण देऊन संबंधीत सरकारी अॅथाॅरिटीकडून घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाल्या नंतर परवाना दिला जातो. एक विमा एजंट केवळ एकाच विमा कंपनीचा एजंट असतो व तो त्याच कंपनीचे काम करतो अन्य कंपन्यांचे नाही.
प्रश्न क्र. 8 - जीवन विमा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर - आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो.
प्रश्न क्र. 9 - एक व्यक्ती कोणाचाही विमा घेऊ शकते का?
उत्तर - नाही. फक्त नात्यातील व्यक्तिचाच विमा घेऊ शकते.
प्रश्न क्र. 10 - जीवन विमा घेण्यासाठी वयोमर्यादा आहे का?
उत्तर - नाही.

आपला,

विलास नामदेवराव व्हटकर
गोरेगाव, मुंबई
भ्रमणध्वनी क्र. 9869388303

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा