रविवार, ३१ जुलै, २०१६

दिनांक 31-07-16: श्री. शुभानन गांगल, जुहू, मुंबई यांचेकडून हाॅट्सअॅप पोस्ट द्वारे:

मराठीला संगणकात अत्याधुनीकता देणारे, ‘जलद सोप्पी मराठी’ हे मराठी टायपींगचे सॉफ्टवेअर, मोफत उपलब्ध केले आहे. त्याबाबतची मागणी माझ्या gangal2016@gmail.com या इमेलवर करा व मोफत मीळवा 1) मराठी टायपींगचे सॉफ्टवेअर, 2) त्याबाबतची चीत्रमय मार्गदर्शीका, 3) उपयुक्त ठरणार्‍या 34 माहीतीपुर्ण फाइल्स. असे तीन फोल्डर्स तुम्हाला मीळतील.

टप्पा 1 – प्रथम 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात सॉफ्टरवेअर डाउनलोड करा.

टप्पा 2 – नंतर 'चीत्रमय मार्गदर्शीका' नीट वाचा. त्यात  'जलद सोप्पी मराठी' इन्स्टॉल कसे करावे याची माहीती दीलेली आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करण्या ऐवजी मला फोन करा. मी तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सुचना मोबाइलवरुन देइन. त्यासाठी तुमच्या सोबत कमीतकमी तीन व्यक्तींना सोबत ठेवा. त्यातील एक व्यक्ती मोबाइल वरुन माझ्याशी बोलेल, दुसरी व्यक्ती कॉम्प्युटर वा लॅपटॉप चालवेल, तीसरी व्यक्ती कागद-पेन सोबत ठेवेल. तुमचा मोबाइल लाउडस्पीकर वर ठेवा आणी माझे बोलणे रेकॉर्ड करा.

माझी मदत घेताना, मी तुम्हाला फोन ठेवायला सांगुन, मीच तुम्हाला फोन करीन. म्हणजे तुम्हाला फोनचाही खर्च  येणार नाही.

मी तुम्हाला, (1) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन, (2) तळात येणारा 'ऑन-ऑफ'चा स्वीच नेहमी दीसण्यासाठी 'Customize Notification' साठीची तरतुद, (3) युनीकोडचे सेटींग, (4) 100 टक्के मराठी टायपींगचे प्रात्यक्षीक अशा गोष्टी करुन देइन.

टप्पा 3 – सोबत दीलेल्या ‘34 माहीतीपुर्ण फाइल्स’ च्या फोल्डर मधे, अनेक माहीतीपुर्ण गोष्टी आहेत. त्यात कीबोर्ड-लेआउट आहे. तसेच व्यंजन, स्वर, बाराखडी, जोडाक्षर, खास-जोडाक्षरे, दहा बोटांनी टायपींग करण्याचे तंत्रज्ञान अशा गोष्टींचा समावेश आहे. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातुन नक्की सुटतील.

एवढे फक्त एकदा केलेत की आयुष्यभर मराठी टायपींग करायला केवळ 'अॉन-ऑफ'चा स्वीच'ऑन' करा आणी '''जेथे कर्सर न्याल तेथे मराठी टाइप करा. जेव्हा 'अॉन-ऑफ'चा स्वीच 'ऑफ' असेल तेव्हा संगणक नीयमीतपणे इंग्रजीत वापरा.

'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरा इतरांनाही परस्पर मोफत द्या. चला, मराठीला मोठे करुया.

हे सारे 'सर्वसमावेशक मराठी' फेसबुक ग्रुपवर https://www.facebook.com/groups/togangal/ उपलब्ध आहे. जरुर ग्रुप जॉइन करा.

कोणतीही अडचण आल्यास फोन करा शुभानन गांगल ९८३३१०२७२७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा