गुरुवार, ९ जून, २०१६

DATE: 09-06-16: FROM MR MAHENDRA BABURAO ASHTEKAR, KANDIVALI, MUMBAI :

 📢📢 📢 *आपला पण 👇🏻 नंबर लागतो का?*  😷😷

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्व्हे केला. निष्कर्ष खालीलप्रमाणे अतिशय धक्कादायक होते.
👉 ६७% भारतीय हे  *इन्शुरन्सला गुंतवणुक* समजतात.
👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.
👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%*  भारतीय निघाले.
👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय एसआयपी हे  एका योजनेच नाव अाहे*अस समजतात.
👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.
👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचल फंङची पाॅलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचल फंङ म्हणजे इंशुरंस मधिलच एक पाॅलीसीसारखा प्रकार अाहे अस समजतात.
👉 *टॅॅक्स फ्री हा बाॅंङ ८0 C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%*  भारतीय अाढळुन आले.
👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ०८ % लोक निवृत्तीजीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंस पाॅलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.*
👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणार्‍या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली.
👉*भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*.जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हाॅस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.
👉भारतात *साधारण विमा घेणार्‍यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले*. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. *आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे* .
पोस्टल लाईफ घेणार्‍याची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.
👉भारतातील *म्युचल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात*.म्युचल फंङ  *वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्याची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात.* त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र्य नाही. म्युचल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे.
👉५४ ईसी बाॅंङ, इंफ्रा बाॅंङ, पीएमएस, काॅर्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्राॅङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.
👉 *भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात* . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्व्हे करणार्‍या तज्ञांनी माङंले.

आर्थिक साक्षर व्हा 🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा