शनिवार, २५ जून, २०१६

दिनांक: 26-06-16: श्री. गणेश अप्पाजी सोनवणे, कांदिवली, मुंबई यांचे कडून

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज
Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur) 
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)

* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च  1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला

 महाराजांचे शिक्षण - *1885 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले 
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.  
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले

* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      - सहकारी कायदा केला व  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
      - जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      - आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      - गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      -  तलाठी शाळा सुरु केल्या.
 * 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      - एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या   
        अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      - शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
 * 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       - देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       - हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       - पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
 * 6 मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा