शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

DATE: 15-10-16: FROM ADV SHRIGANESH SALBA SAWALKAR, TULJAPUR:

 👏🏻👏🏻अाता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे🌷🌷🐄🐃🐏🐬🐓🐠🐟🌲🌳🌻🌴🌱
____________________
1-अाहे ती मंदिरे पुष्कळ अाहेत.नवीन मंदिरं उभारणी बंद करा.वर्गणी देऊ नका. किती मंदिरात तुमच्या मुलांना पुजा-याची नोकरी लागली. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या अारोग्यावर, गुंतवणूकीवर करा.

2-दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ नि पैसा) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव अाहे यावर विश्र्वास ठेवा.(भक्त पुंडलिक)

3-'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू. घेतो. या बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, अाराेग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे अायोजन करा.

4-शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. काेर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

5-कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची  जास्त काळजी घेणारे अाहेत.

6-शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्याेग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायाठी शक्य तेवढी मदत करा.

7-अापण  सर्व जाती-धर्मांचा अादर करा. जातीवादाच पाप अापण तरी करू नका.

8-मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या.(महापुरे मोठी झाडे जाती, लव्हाळे वाचती)

9-राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोंमुळे समाजाचे खूप मोठ नूकसान झालेय. अाता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचं कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.

10-कमीत कमी गावात अाणि जास्त वेळ शेतात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात)

11-खेकडा वृत्ती सोडून समाजातील इतरानां मदत करा(एकमेका साह्य करा)

12-नियोजन व काटकसरीने(अाहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.

13-यात्रा जत्रा सत्यनारायण वास्तुशांती जागरणगोंधळ डोहाळे(अोटीभरण) पाचवी बारावी वाढदिवस मर्यादीतच ठेवा.

14-भांडकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा. मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.

15-घरातील महीलांना मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.

16-महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा अाणि व्यख्यान,उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास,विज्ञानाची पुस्तक हातात द्या.

17-कर्मकांड करणे टाळा.  त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.

18-आपण कमविलेल्या पैश्यातुन आपल्या कुटुंबाला खुप खुश ठेवा.

मानवजन्म पुन्हा नाही
____________________
👏🏻👏🏻💐💐💐💐👏🏻👏🏻

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६


DATE: 13-10-16: FROM MR JAGDISH M JADHAV, BANGALORE:

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*,
*आणि*
*हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*,
*जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.
    🌅 *चिंता* *केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत* *नाही,*
*पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग सापडतो....*
*कोणी "कौतुक" करो वा "टिका"....*
*लाभ तुमचाच आहे .....*
*कारण..... कौतुक "प्रेरणा" देते,*
*तर टिका "सुधारण्याची" संधी...!!!*

🌅 *माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, *वैतागाला कारणीभूत ठरत असतो.* *अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍याची कागाळी करणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या दुःखात आपल सुख मानणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.*

☄ *साडून द्या :*
*दुसऱ्या ची फालतू चौकशी करणे.*

☄ *सोडून द्या :* 
*दुसऱ्याला कमी लेखन स्वतःला श्रेष्ठ समजणे.*

☄ *सोडून द्या :*
*तुमचा खोटा अहंकार*

☄ *सोडून द्या :*
*स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्या ला दुःखी करणे.*

☄ *सोडून द्या :*
*एखाद्या व्यक्तील तोंडवर न बोलता त्या व्यक्ती बद्दल मागे दुसरया व्यक्ती जवळ टीका टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्या सारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.*

☄ *सोडून द्या:*
*सगळ्या मित्र परिवारा मधे मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकाना कमी लेखणे.*

👉 *लक्षात ठेवा.*
*आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकाना समजले की लोक आपल्या पासून दूर होवू लागतात.*

🌅 *तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.*

🌅 *एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता. चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !*

*मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"*

*कुंभार म्हणाला, "मी चिलीम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"*

*माती म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"*

*तात्पर्य :* *जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !*

🌅 *कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा..*

*राजाला त्याची प्रजा मानते,*
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!*

🎯 *पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते.*🎯
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
         🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

DATE: 12-10-16: FROM ASHOK D VHATKAR, PUNE:

*आज १२ ऑक्टोबर*
*आज चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री मा.शांता शेळके यांची जयंती*
जन्म :- १२ ऑक्टोबर १९२२
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मा.शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर मा.शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. *मा.शांता शेळके* यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे *मा.शांता शेळके* यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
*९४२२३०१७३३*
संदर्भ :- marathiworld.com
DATE: 12-10-16: FROM MR ANIL UKHARDU KAKDE, KALYAN:

चर्मकार समाजातील बंधू , भगिनी आणि मातांनो,
*समाज बांधवांनी नविन व्यवसाय सुरू करावा आणि ज्यांचा सध्या व्यवसाय सुरू आहे त्यांचा व्यवसाय वाढवावा याकरिता मदत व्हावी* म्हणून मी *WhatsApp* वर उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे .
ह्या उपक्रमात *दोन GROUP* असणार आहेत.
१] चर्मकार समाजातील ज्यांना *नविन व्यवसाय* सुरु करायचा आहे.
२] चर्मकार समाजातील ज्यांना *सध्या सुरु असलेला व्यवसाय* वाढवायचा आहे.
*अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे असतील*
१] *GROUP मध्ये Add झाल्यानंतर आपण समाजाच्या कोणत्याही संघटनेत असला तरी GROUP मध्ये संघटनेचे किंवा नेत्याचे उदोउदो करणाऱ्या कोणत्याही पोस्ट टाकायच्या नाहीत*.
२] GROUP मध्ये व्यापार हाच आपला *धर्म* आणि व्यापारी हीच आपली *जात* असणार आहे हे लक्षात ठेवावे
३] *GROUP मध्ये कोणतेही फोटो, कविता, जोक्स ,कथा , VDO,Good Morning, Good Night, आणि मी वेळोवेळी सांगेल तसे कोणतेही Message टाकायचे नाही*.
४] GROUP मध्ये ज्या दिवशी *जो विषय घेण्यात येईल त्याच विषयावर चर्चा करायची आणि प्रश्न विचारायचे*. विषय सोडला तर एकदाच सूचना करण्यात येईल .नंतर मात्र GROUP मधून *Remove* केले जाईल.
५] नियमांचा भंग केल्यास GROUP मधून Remove केले जाईल आणि नंतर कितीही विनंती केली किंवा माफी मागितली तरी GROUP मध्ये पुन्हा समाविष्ट केले जाणार नाही.
६] *GROUP मध्ये आपल्याच माता भगिनी आहेत याची जाणीव ठेवावी*
७] GROUP चे *काम सुरु झाल्यानंतर मध्येच कुणाचेही नाव GROUP मध्ये समाविष्ट करण्यासाठी सुचवायचे नाही*. कारण त्याला अर्धेच ज्ञान मिळेल आणि ते त्याच्या काहीही उपयोगाचे नसणार आहे. *नावच सुचवायचेच असेल तर GROUP सुरु होण्याआधीच सुचवा*
>>>>>> *महत्वाचे* <<<<<<
१] ज्यांना *नविन व्यवसाय सुरु करायचा* आहे अशा बंधू भगिनींनी आपले नाव शहर किंवा गावाचे नाव लिहिल्यानंतर  *NEW*'असे लिहून माझ्या 9324552963 ह्या WhatsApp नंबरवरिल ""वैयक्तिक Account"" वर पोस्ट करावे
२] ज्यांना सध्या सुरु असलेला *व्यवसाय वाढवायचा आहे* अशा बंधू भगिनींनी आपले नाव शहर किंवा गावाचे नाव लिहिल्यानंतर  *OLD* असे लिहून माझ्या 9324552963 ह्या WhatsApp नंबरवरिल ""वैयक्तिक Account"" वर पोस्ट करावे
३] *लक्षात ठेवा* माझ्या *9324552963* ह्या WhatsApp नंबरवरिल *वैयक्तिक Account* वर पोस्ट करायचे आहे *GROUP मध्ये* अजिबात नाही
पैशांची अडचण भासली कोणताही नेताच नव्हे तर नातेवाईक देखिल मदत करण्यास पुढे येत नाही. अशावेळी एखादयाकडे उसने पैसे मागतांना जी अवस्था होते तिला लाचारी असे म्हणतात. *लाचारी हि मृत्यू पेक्षाही वाईट असते* तुमच्या लाचारीचा पैसे उसने देणारा पण *गैरफायदा* घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैसे उसने मागणारी जर माता भगिनी असेल तर  *बऱ्याच जणांच्या  वासनेने*
*बरबटलेल्या*  नजरा  तर *किळसवाण्या* ठरतात.
                  म्हणून *समाजातील बंधू भगिनींनो स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा* म्हणजे कोणत्याही *नेत्यांचे किंवा नातेवाईकाचे उंबरठे* झिजवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. यासाठी *स्वतःचे व्यवसाय सुरू करा आणि ज्याचे सध्या व्यवसाय सुरू असतील त्यांनी व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा*
लक्षात ठेवा तुमच्या खिशात खुळखुळणाऱ्या केवळ पैशांमुळे जग तुम्हाला *सलाम* करिल. कुणासमोरही *लाचार* होण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. *स्वाभिमानाने* जगाल.
*चला तर मग व्यवसाय करू या,*            *श्रीमंत होऊ या*,
            *लाचारीला लाथ मारून स्वाभिमानाने जगू या*
जय रोहिदास जय रविदास
*अनिल काकडे.कल्याण*
*[ 9324552963 ]*
कृपया हि पोस्ट चर्मकार समाजातील सर्व बंधू, भगिनी आणि मातांना *FORWARD* करावी हि नम्र विनंती

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

DATE: 07-10-16: FROM MR GANESH A SONAVANE, KANDIVALI, MUMBAI:

मराठा आरक्षण : मा. न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची मुलाखत जशीच्या तशी

प्रश्न : मराठा समाजाचे जे मोर्चे निघताना बघतो आहोत, तर अनेक प्रश्न आहेत, मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे. जसे आम्हाला आरक्षण द्या, ही जी मागणी होतेय, तर एकूण घटनेमध्ये जी तरतूद आहे, ती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का? आणि ते द्यायचं असल्यास कशाप्रकारे द्यावं लागेल.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : घटनेमध्ये दोन बाबतीत आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. एक शिक्षणसंस्थेमध्ये आणि दुसरं सरकारी नोकऱ्यांमध्ये. आता शिक्षणसंस्थेमध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे, ते घटना कलम 15 च्या खाली ठेवण्यात आलेले आहे आणि तिथे स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेले आहे की, हे आरक्षण शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले लोक यांच्याकरताच राहील. आणि अर्थात शिक्षणसंस्थांमध्ये म्हणजे खासगी शिक्षणसंस्थांमध्येही ठेवण्यात आलेले आहे. मग ते अनुदानित असो वा अनुदानित नसो. त्यामुळे आज कुठल्याही समाज समूहाला जर शिक्षणात आरक्षणाची मागणी करायची असेल, तर एकतर ते शेड्युल कास्ट किंवा शेड्युल ट्राईब याच्यामध्ये समाविष्ट आहे, असे दाखवावं लागेल किंवा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, हे दाखवावं लागेल. आतापर्यंत परिस्थिती अशी झालेली आहे की, महाराष्ट्रात दोन आयोग नेमले गेले होते. या दोन आयोगांनीही असं ठरवंलं की, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. त्यामुळे त्यांचा या ज्या ओबीसी जाती म्हणून ज्यांची यादी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आतापर्यंत समावेश झालेला नाही. आणि तो समावेश व्हावा, ही या मोर्चाची एक मागणी आहे. तशी मराठा समाजाची कित्येक वर्षे ती मागणी आहे. हा एक शिक्षणाचा प्रश्न.

नोकऱ्या ज्या आहेत, त्या केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व किंवा कुठल्याही मागास असलेल्या जातीसाठी आहेत. त्याच्यामुळे तिथे आर्थिकदृष्ट्या मागासलेले, फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले यांच्याकरिता जागा आरक्षिण ठेवण्यात येतात. परंतु, अट एवढीच आहे, मागासलेल्या समाज समूहाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्यात येईल, त्यांचं सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्त्व अपुरं असलं पाहिजे.

P B Sawant 1

प्रश्न : आपण म्हटलात की, महाराष्ट्रामध्ये दोन आयोग नेमण्यात आले, ज्यामधून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, असे अहवाल देण्यात आले. तर मग प्रश्न उरतो, शैक्षणिकदृष्ट्या मागास असण्याचा. यासंदर्भात काय करता येऊ शकतो?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असावा लागेल. फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही किंवा फक्त सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही, तो शैक्षणिकदृष्ट्याही मागासलेला असायला पाहिजे. हे शिक्षणातील आरक्षणाबद्दल आहे. तर जर तिथे दुसऱ्या कुठल्या मागासलेल्या वर्गाला समाविष्ट करुन घ्यायचे असेल, शैक्षणिक राखीव जागांकरिता, तर घटना कलम 15 मध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल.

प्रश्न : ही दुरुस्ती काय असू शकते?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : त्याच्यामध्ये आज जे शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग घातलेला आहे. त्याच्यात आणखी एक आर्थिकदृष्ट्या मागासलेला, असा वर्ग घालावा लागेल. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले तर सर्वच आहेत. म्हणजे या देशातील जवळजवळ 85 टक्के लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही आणि ते सर्व धर्म, सर्व जातींमध्ये आहेत. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग आपण त्याच्यामध्ये आणला, तर सर्व जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे आहेत, त्या सर्वांना त्यात आरक्षण मिळू शकेल.

प्रश्न : सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण देण्यची तरतूद आहे. एखादी जात म्हणून आरक्षण देण्यची तरतूद नाही.   

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : जात म्हणून आरक्षण देण्याची नाही. ही जर दुरुस्ती करण्यात आली, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले, असा एक वर्ग त्या घटना कलम 15-3 मध्ये घालावा लागेल.

P B Sawant 4

प्रश्न : तुम्ही म्हणालात की, जो समाज मागासलेला आहे असे आपण म्हणतोय, त्या समाजाचा पुरेसं प्रतिनिधित्त्व जर सरकारी नोकऱ्यांमध्ये नसेल, तर त्या समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आरक्षण लागू होऊ शकतं. तर ते थोडसं अधिक विस्ताराना सांगा.   

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : असंय की, सरकारी नोकऱ्यांमध्ये चार श्रेणी आहेत – वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा. तर वर्ग चौथ्यामध्ये जवळजवळ सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व तऱ्हेने मागासलेले लोक आहेत, त्यांचं प्रतिनिधित्त्व आहे. भरपूर आहेत. किंबहुना त्या नोकऱ्यांत फक्त याच वर्गाचा समावेश आहे. तेव्हा प्रतिनिधित्व अपुरं आहे की पुरेसं आहे, याचा विचार करताना त्या त्या वर्गामध्ये जे प्रतिनिधित्त्व असेल, त्याचा विचार करावा लागेल. आज सचिवालयामध्ये शिपायांची जी जागा आहे, ती क्लास फोरमध्ये आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मराठ्यांचा किंवा तत्सम जातींचं प्रमाण आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्त्व आहे, त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये आता कुठल्याच वर्गांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही, असं म्हणणं चुकीचं होईल. तुम्हाला प्रत्येक वर्ग धरुन, त्या वर्गामध्ये किती प्रतिनिधित्त्व आहे, हे तुम्हाला शोधावं लागेल.

प्रश्न : पण आज सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून सांगितलं जातंय की, आम्ही जात म्हणून आरक्षण देऊ. असं आश्वासन दिलं जातंय. तर हे कायद्याच्या कसोटीवर, निकषांमध्ये बसणारं आहे का? की हे राज्यकर्ते दिशाभूळ करत आहेत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हे घटनाबाह्य होणार आहे. आणि जात किंवा धर्म यांच्या नावाने काही कोटा जर आरक्षणात ठेवण्यात आला, तर ते बेकायदेशीर होणार आहे. तेव्हा या आश्वासानांना कायदेशीर काही आधार नाही. आणि ती पोकळ ठरणार आहे.

प्रश्न : कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता नाही?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शक्यता नाही.

प्रश्न : म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात स्टेज ही आहे की, राज्य सरकारने जातनिहाय आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, ते न्यायालयाने फेटाळलेलं आहे. द्यायचं झालं तर जातनिहाय आरक्षण मागे घेऊन, आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु करायला हवेत. जर सरकारला खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : बरोबर.

P B Sawant 5

प्रश्न : काही राजकीय पक्ष, पक्षांचे नेते अशी भूमिका मांडतायेत की, आरक्षण हे फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरच द्यायला हवं. याबद्दल तुमची काय भूमिका आहे?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : ही मागणी केवळ आजच होत नाही. फार पूर्वीपासून होत आलेली आहे. पण जे लोक ही मागणी करतात, तू एक मुलभूत गोष्ट विसरतात. ती अशी आहे की, प्रथमत: आज जे आरक्षण, मग ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी असेल, ते वास्तवात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठीच आहे. दुसरं असं की, आपण हे विसरतो की, या समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले, असे वर्ग आहेत. परंतु, शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांमध्येही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. जर तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, या एकाच निकषावर आरक्षण ठेवलं, तर या जागांचा उपयोग जास्त कोण करु शकतील? तर जे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले लोक आहेत, तेच करु शकतील. कारण शेवटी तुम्ही गुणाप्रमाणे जाणार. म्हणजे आजची जी व्यवस्था आहे, ती तशीच कायम राहणार आहे. त्यामुळे हा विचार लोक करत नाही. थोडा उथळ विचार करतात.

प्रश्न : आर्थिकदृष्ट्याच फक्त आरक्षण असावं, हा उथळ विचार आहे?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हा अत्यंत उथळ विचार आहे. कारण त्यांना आरक्षणाचा हेतूच समजलेला नाही. आरक्षण हे मृगजळ आहे. आरक्षणामुळे अगदी मागासलेल्या वर्गातील लोकांचं सुद्धा, मग ते शेड्युल कास्ट असो, शेड्युल ट्राईब असो किवां ओबीसी असो, किती लोकांचं कल्याण होणार आहे? आणि मी असं धरुन चालतो. म्हणजे आजच्या या मोर्चांचं मी स्वागत या दृष्टीने करतो की, मराठा समाज का होईना, पण कुठल्यातरी समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. ही जी शक्ती निर्माण झाली आहे. एकजूट. आणि त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण झाली आहे. हीचा उपयोग एक विशाल क्रांती करण्याकरता, की ज्या क्रांतीमुळे आम्हाला या देशामध्ये असा समाज निर्माण करता येईल की, जिथं सर्वांना नोकऱ्या, सर्वांना मोफत शिक्षण प्राप्त झालेलं असेल. त्या ध्येयाकडे आमचं लक्ष नाही. उलट त्या ध्येयापासून आमचं दुर्लक्ष होत आहे.

प्रश्न : म्हणजे आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन मूळ प्रश्नापासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हे आपण जे बोललात, ते बरोबर आहे. तेच मला सांगायचं आहे. म्हणून आता, आता तरी असे मी म्हणेन. आता 66 वर्षे जाली घटना येऊन. घटनेतील आपले जे मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्याच्यामध्ये अशा समाजाचा आराखडा देण्यात आलेला. तो आराखडा जर आपण कार्यान्वित केला किंवा त्याची अंमलबजावणी केली किंवा अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरुन चळवळ केली, तर आज आपण असा समाज निर्माण करु शकतो.

P B Sawant 3

प्रश्न : आंबेडकरांनीसुद्धा आरक्षणाची तरतूद करताना असं म्हटलं होतं की, हे 10 वर्षांसाठी आहे आणि 10 वर्षांनंतर याचा पुनर्विचार व्हावा, पुनरावलोकन व्हावं. तर याबद्दल काय वाटंत की, पुनरावलोकन कशाप्रकारे व्हायला हवं? आणि आता जे आरक्षण चालू आहे, त्याच्यामध्ये बदल करायचे असल्यास त्यामध्ये कशाप्रकारे करायला हवेत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : काय आहे, ही जी 10 वर्षांची जी तुम्ही मुदत सांगितली मला, ती आज तरी घटनेमध्ये फक्त संसद, विधानसभा यांच्यामध्ये ज्या जागा आहेत, त्यांच्यापुरतीच घटनेत लिहिलेली आहे. या नोकरीतल्या किंवा शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणात अशी कुठलीही मुदत घातलेली नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. लोकांचा गैरसमज आहे यो गोष्टींमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की, हे जे आरक्षण देण्यात आलेले आहे, ते प्रत्येक मागास समाजाला म्हणून दिलेले आहे. कुठल्याही व्यक्तीला किंवा कुटुंबासाठी ते ठेवलेले नाही. त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षणाचा उपयोग केलेला आहे, ज्यांना फायदा मिळालेला आहे, त्यांनी निदान एक किंवा दोन पिढ्यांनंतर आरक्षण मागू नये. आपल्याच समाज समूहातील जे इतर आहेत, त्यांच्यासाठी त्या जागा मोकळ्या करायला हव्यात. या दृष्टीने विचार व्हायला हवा. पण त्याकरिता आपण क्रिमिलियर लावले आहे. क्रिमिलियरमध्ये जर त्यातले लोक गेलेले असतील, तर ते आरक्षण कक्षेच्या बाहेर जातात.

प्रश्न : पण अनुभव असा आहे की, क्रिमिलियरची तरतूद जरी केलेली असली, तरी उत्पन्नाचा दाखला कसा मिळतो, त्याच्यामध्ये तुम्ही कसं तुम्हाला हवा तसा दाखला घेऊ शकता, हे सर्वांना ठाऊक आहे. तर ही जी आपली एकंदरीत व्यवस्था आहे, ती तुम्हाला अधिक व्यवस्थित करायला लागेल.  

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे. आणि सरकारी यंत्रणेत, मग ते सर्व खात्यांमध्ये जे दोष आहेत, ते या यंत्रणेतही आहेत. तेव्हा याचा उपाय म्हणजे ही यंत्रणा सुधारणं हा आहे. म्हणून आरक्षण काढावं किंवा त्याचा अमूलाग्र पुनर्विचार करावा, असं नाही. सदोष यंत्रणा सुधारणं, हा एकच त्यावरील उपाय आहे.

P B Sawant 2

प्रश्न : आपण बघतो की, विदर्भामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मिळतं याच समाजाला. इकडे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात मात्र मराठा म्हणून जी नोंद आहे, त्यामुळे आरक्षण मिळत नाही.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : ही नावं झाली. वर्ग तोच आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला विदर्भामध्ये कुणबी म्हटलं जातं, इथे मराठा म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याच्या परिस्थितीत काही फरक होतो का?

प्रश्न : मग सर नाव बदललं तर प्रश्न सुटेल का?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : नाही. आता हा नावाचा प्रश्न राहिला नाही, वर्गाचा प्रश्न झालेला आहे. इथं आता नुसतं कुणबी म्हणून ते चालणार नाही किंवा तिथल्या कुणब्यांना मराठा म्हणून त्यांना जे आरक्षण मिळतंय ते काढून घ्या, हे करुन चालणार नाही. हे होणार नाही. ते शक्यही नाही. तेव्हा त्याला अंतिम उपाय हाच आहे की, आपण याकरता चळवळ केली पाहिजे की, या देशात नवसमाज निर्माण होईल. जो आमच्या घटनेला अभिप्रेत आहे. जिथे आम्हाला आरक्षण ठेवण्याची गरज पडणार नाही.

प्रश्न : एवढे मोठे मोर्चे अतिशय शांतपणे, सुनियोजितपणे होणे, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये न होणं.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हा तर आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरिता सर्व समाजातील, सर्व मागासलेल्या समाजातील नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, एकमेकांशी भांडत न बसता. यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढतो, असे नको व्हायला. सर्वांनी एकत्र येऊन, खरंतर मोठी संधी चालून आली आहे. हे नेत्यांनी समजून घ्यायला हवी.

निरनिराळ्या ठिकाणी भाषणं करत फिरत असतात फक्त आणि आपापल्या समाजाला आश्वासानं देत फिरत असतात, ते थांबवून या क्रांतीसाठी आता ही चळवळ सुरु करायला हवी. निदान आता तरी सुरुवात व्हायला हवी. आणि पहिली मागणी आपली अशी असायला पाहिजे की, आमच्या घटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्त्व सागितली आहेत, त्याच्यामध्ये जी आर्थिक धोरणं सांगितली आहेत, जी सामाजिक धोरणं सांगितली आहेत, त्यांची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांना मुलभूत हक्कांचं स्थान देण्यात आले पाहिजे.

प्रश्न : जेणेकरुन असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि आरक्षणाचा जो गुंता केला जातो आहे, त्यामध्येच सर्व अडकून पडणार नाहीत.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : मागासलेल्या समाजाचे जे पुढारी आहेत, त्यांनी हे समजून सांगायला हवं की, त्यांचे प्रश्न आरक्षणाने सुटणार नाहीत. उलट बहुजनसमाजामध्ये, जे मागासलेले समाज आहेत, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होणार आहे. त्यामुळे आपलं जे लक्ष असायला हवं, त्यापासून लक्ष विचलित होईल. उलट आज असं दिसतंय की, या देशातील जो प्रस्थापित वर्ग आहे, तो खुश आहे. कारण आजच्या समाजरचनेत, आजच्या आर्थिक रचनेत त्यांचे फायदे होत आहेत. त्यांचा तो एक स्वार्थ निर्माण झाला आहे. तर ते कायम राहावेत आणि इतरांनी दुसरीकडे लक्ष वळवावं, ही आजची समाजरचना मोडू नये, तिला हात लावू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. आणि ते यांचा उपयोग करुन घेणार आहेत. आपण जर सारा इतिहास पाहिला, तर आपल्याला असंच दिसून येईल. ज्यांना खास हक्क प्राप्त झालेले आहेत, मग ते सामाजिक व्यवस्थेत असो, आर्थिक व्यवस्थेत असो, ते आपापलं स्थान मजबूत करण्याकरिता आणि सुरक्षित करण्याकरिता त्यांनी वेळोवेळी याच मार्गाचा अवलंब केला.  

P B Sawant 4

प्रश्न : आरक्षण नक्की किती टक्के असावं? तामिळनाडूचं उदाहरण त्यासाठी आपल्यासमोर आहे. तर ते आपल्या येथे शक्य आहे का? तामिळनाडूमध्ये जे झालं, ते आपल्या येथे का नाही?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे ही टक्केवारी आहे, ती किती पवित्र आहे. दुसरं असं की, टक्केवारी जरी आपण वाढवली, तर कुठल्या एका विशिष्ट जातीचं कल्याण  होणार आहे का? हा दुसरा प्रश्न.

पहिलं आपण टक्केवारीचं बघू. टक्केवारी कशी आली आहे, कुठल्या तत्त्वावर आलेली आहे? असं मानलं गेलं की, नियम हा नेहमी मोठा असतो. त्याला अपवाद म्हणून आरक्षण. तर अपवाद हा कमी असायला पाहिजे. पण हेच अवास्तव आहे. अवास्तव याकरिता की, या देशामध्ये 85 टक्के मागासलेले आहेत, 15 टक्के पुढारलेले आहेत. मग इथला नियम कुठला? 85 टक्के हा नियम झाला, 15 टक्के हा अपवाद होईल. मग आरक्षण ठेवायचं झाल्यास, पुढारलेल्या वर्गासाठी ठेवा आणि 85 टक्के ओपन कॅटेगरीसाठी ठेवा. म्हणजे मागासलेल्यांसाठी. म्हणजे सर्व मागासलेल्या जातींना 85 टक्के आरक्षण मिळेल. त्यामुळे या टक्केवारीला विशेष असं काही पावित्र्य नाही.

प्रश्न : कायद्याच्या पटलावर हे टिकेल का?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : अशी मांडणी झाली पाहिजे. समजा असं आपण धरुन चालू की, मराठा समाज असो वा दुसरा आणखी कोणता समाज, ते असे म्हणाले की आमचा समाज ओबीसीमध्ये करा. तर ओबीसीसाठी ज्या आज 27 टक्के राखीव जागा आहेत, त्या वाढवा. मग 22 टक्के वाढवा, 25 टक्के वाढवा आणि त्या वाढवल्या गेल्या. परंतु हे 25 टक्के मराठा जातीसाठी म्हणून ठेवण्यात येणार नाही. त्या ठेवता येणारच नाही. जातीसाठी ठेवणं हे घटनाबाह्य आहे. फक्त हे 25 टक्के ओबीसींच्या 27 टक्क्यांमध्ये अॅड होतील. म्हणजे 43 किंवा 45 टक्के होतील. परंतु हे सगळ्या ज्या 45 टक्के राखीव जागा आहेत, त्यामध्ये सर्व ओबीसी जातींना आरक्षण मिळेल. म्हणजे सर्व जातींना स्पर्धा करावी लागेल, या 45 टक्क्यांसाठी. असं नाही म्हणता येणार की, हे 25 टक्के मराठ्यांसाठी ठेवले आहेत, त्यामुळे इतर ओबीसी जातींनी त्यात भाग मागू नये. असं करता येत नाही.

प्रश्न : वेगळे असे मराठा समाजासाठी नाही ठेवता येत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : मराठा समाजासाठीच नव्हे, कुठल्याच समाजासाठी तसं करता येणार नाही.

प्रश्न : दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्याची. काही ठिकाणी तो रद्द करावा, अशीही मागणी झाली. मात्र,प्रामुख्याने मागणी झाली म्हणजे त्या कायद्यात बदल करण्याची. या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : अॅट्रॉसिटी कायदा चांगला आहे. तो असायला पाहिजे. त्याचा दुरुपयोग होत आहे. पण याचा अर्थ असा नाही, डोकं दुखलं म्हणून डोकं कापून टाका. आपण त्याकरिता उपाय शोधून काढतो. उपाय आहेत.

कशामुळे हा दुरुपयोग जास्त होतो आहे? आज या कायद्यान्वये पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली, तर आरोपीला ताबडतोब अटक करुन कस्टडीत टाकण्याची पोलिसांना परवानगी आहे. तर हा जो पोलिसांना अधिकार दिला आहे, तो पोलिसांना अधिकार न देता, तक्रार आल्याबरोबर अटक न करता, जी खास न्यायालयं नेमण्यात आलेली आहेत, त्या न्यायाधीशांची परवानगी घेतल्यानंतरच आरोपीला अटक केली पाहिजे.

प्रश्न : जातीय अत्याचार झाला आहे का, याची खातरजमा आधी व्हायला हवी. त्यानंतरच अटक व्हायला हवी.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : पण खातरजमा न्यायाधीश करणार नाही. पोलीस अधिकारी करणार. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला अटक करावी.

P B Sawant 1

प्रश्न : जर कुणावर जातीय अत्याचार झालेला आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या सर्व गोष्टी न्यायालयासमोर मांडाव्यात?  

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : न्यायालयात म्हणजे कोर्टात जाऊन सर्व सिद्ध करावं आणि अटक करावी, असं नाही. जो न्यायाधीश असेल, त्याच्या परवानगीने अटक करावी. कारण त्याच्या घरी रात्री जाऊन सुद्धा ही परवानगी घेता येते. जसं की एखादा जामीन मागायचा झाल्यासही आपण रात्री जाऊनही जामीन मागू शकतो, तशी परवानगी हवी.

आता याचबरोबर दलितांच्याही तक्रारी आहेत आणि त्याही बरोबर आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या तक्रारी लिहून घेण्यातच येत नाहीत. एफआयआर दाखल करुन घेतलाच पाहिजे, अशी खास तरतूद करण्यात आली पाहिजे. आणि जर तो दाखल करुन घेण्यात आला नाही. तर जो कुणी पोलीस अधिकारी तिथे असेल, तो गुन्हा करतो आहे, असे मानले जावे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही एक सुधारणा त्यात झाली पाहिजे.

दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे, या ज्या तक्रारी होतात आणि त्यामुळे जे खटले चालतात. हे किती दिवसात निकालात काढले पाहिजेत, याचं काही विशिष्ट काळाचं बंधन घातलेलं मला तरी दिसलं नाही. तेव्हा सहा महिन्यांच्या आत हे खटले निकालात काढावेत, अशी तरतूद कायद्यात केली पाहिजे. म्हणजे काय होईल, एक तर दलितांना संरक्षण मिळेल, किंबहुना आजचं संरक्षण आणखी मजबूत होईल आणि आणि आरोपी जे आहेत, ज्यांच्याविरुद्ध कायद्याचा दुरुपयोग होतो, त्यांनाही संरक्षण मिळेल. त्यांनाही न्याय मिळेल.

प्रश्न : आपल्याला जातीअंताकडे जायचं असेल, तर त्यासाठी काय करायला हवं?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : सर्व जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आल्याशिवाय त्यांच्यामध्ये बेटी-व्यवहार होणार नाही. म्हणून आपण सर्व जातींना संस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आणलं पाहिजे. या मागासलेल्या जाती जर त्या सांस्कृतिक पातळीवर यायच्या असतील, तर त्यांना शिक्षण,  त्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती ही किमान व्हायला पाहिजे आणि आरक्षणाचा हेतू काय शेवटी? की ज्या मागासलेल्या जाती आहेत, त्यांना पुढारलेल्या जातींच्या पातळीवर आणणं. हे जे पाऊल टाकण्यात आलेले आहे, ते द्रुतगतीने पुढे जायला पाहिजे. आणि केवळ काही व्यक्ती, काही कुटुंब वर येऊन चालणार नाही. संबंध जाती म्हणून किंवा जात समूह म्हणून त्यांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो, आम्हाला जो नवीन समाज निर्माण करण्याचा आदेश दिलेला आहे घटनेने आणि आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत असा समाज निर्माण करण्याकरता, त्यादृष्टीने त्वरित पावलं उचललं गेली पाहिजेत. ही केवळ महाराष्ट्रापुरती क्रांती नाही. संबंध देशभर ही क्रांती झाली पाहिजे.

म्हणूनच मी या क्रांतीकडे सबंध देशातील समाजक्रांतीची नांदी या दृष्टीने पाहतो

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

DATE: 03-10-16: FROM MR YASHWANTRAO S MORE, MUMBAI:

शीतल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज

*उठ मराठ्या जागा हो!*
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.

*साखर कारखाने -*
कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
सांगली  - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
पुणे-  एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4  ,
नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2  ,
अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी  1 ,
अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी  2 ,
नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी  2 ,
भंडारा-एकूण 1,  कुणबी-मराठा  1

महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170
धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124

*मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था -*
1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
2 जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास  बँक 29
3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
4 कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
5 सहकारी सूत गिरणी 167
6 सहकारी हातमाग संस्था 685
7  सहकारी यंत्र माग संस्था 1378
8 सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
9 सहकारी दुध संघ 78
10 सहकारी मार्केटिंग संस्था 1779

मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था -
इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500
वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12
वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20
आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32

*मराठा मंत्रिमंडळ -*

यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 9
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ -   1967 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 10
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ -  1972 एकूण मंत्री -12
मराठा मंत्री 4
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977  एकूण मंत्री -23
मराठा मंत्री 14
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 8
शरद पवार ( युती)   मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 8
अ.र. अंतुले मंत्रिमंडळ  1980 एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8
मराठा मंत्री 5
शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22
मराठा मंत्री 4
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26
मराठा मंत्री 16
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27
मराठा मंत्री 13
अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती) एकूण मंत्री -29
मराठा मंत्री 14
पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते  सप्टेंबर 2014
मंत्री -30
मराठा मंत्री 16
--------------
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.

हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मॅसून वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी.

शीतल पाटील, एक शेतकऱ्याची पोर