गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

DATE: 22-09-16: FROM MR NAVAL R ADSUL, KHAR, MUMBAI:

माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,

आता बघा हं...

ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....

सगळेच वेगवेगळ्या जातीचे

तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????

कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....

जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....असे का ?

कोणी रचला हा ढोंगीपणा...!!
                                          🔭
मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी अब्दुल कलामांवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही मुस्लिम अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......
“ती"माणसे  गेली कुठे 

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त 
जात जिवंत ठेवली आहे.
मात्र इथेही मनात प्रश्न उभा राहतो तो हा की , जी गोष्ट मनातून " जात " नाही ती " जात " की आणखीनच वेगळी कोणती ..🙏

सर्व पित्री आमवश्या येई पर्यन्त  सगळ्यांचा संबोधन व् प्रबोधनाचा हिस्सा होउयात .... त्या ऐवजी एखाद्या गरीब मुलाला अन्न देऊया ,पुस्तक देऊया, त्याच्या प्रगतिचा हिस्सा होण्याचा छोटासा प्रयत्न करुया .......
 अन्नाचा (काल्पनिक धुर )वर पोहचुन आत्म्यांना खुश करण्या पेक्षा  जिवंत असणाऱ्या आत्म्याला वैज्ञानिक प्रगतिची मशाल पेटउन देऊया...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा