सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

DATE: 19-09-16: FROM MR YASHWANTRAO S MORE, MUMBAI:

*मराठा .... सत्य*                                             १९४८ ला गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीत बहुतेक ब्राम्हण जमीन जायदाद सोडून गावातून पळून गेले आणि शहरात स्थाईक झाले. त्यानंतर गावाची सगळीच्या सगळी सत्ता मराठ्यांच्या हातात आली. गावाचे चालक मालक कर्ते धर्ते तेच बनले. बलुतेदारांना पोटावारी घरगड्यासारखे राबवून घेतले. नुसत्या बांधावर बसून दोन-दोनसे तीन-तीनसे एकर शेती पिकून घेतली. तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पाटिलकी गाजवली. चार चार बायका करून आणखी वरून रांडा ठेवल्या. फेट्यासोबत उडवून उरलेल्या नोटा कोर्ट कचेर्यात उडवल्या. नोटा आटू लागल्यावर पुन्हा एकरा एकराने शेती फुकली. गुरं विकले, ढोरं विकले. शेवटी वाड्याची मातीही विकली. आता विकायला काहीच उरलं नाही म्हणून यांना आरक्षण पाहिजे? 

ग्रामपंचायती, पंचायत समित्या, झेडप्या यांच्या ताब्यात. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदं, मुख्यमंत्रीपदं यांच्या ताब्यात. सुतगिरण्या, साखरकारखाने, दुधडेर्या यांच्या ताब्यात. सोसायट्या, सहकारी बॅंका, शिक्षण संस्था यांच्या ताब्यात. तरी यांच्यावर अन्याय झाला म्हणे! कुणी केला हा अन्याय? गावकुसाबाहेर राहणार्या दलितांनी? जंगलात राहणार्या आदिवासींनी? बिर्हाड पाठीवर घेवून गावोगावी भटकणार्या भटक्यांनी? दिवसभर गाड्यावर काही वाही विकून पोट भरणार्या मुसलमानांनी? सांगा  मराठ्यांनो तुमच्यापैकी किती जन गावा बाहेर पालं ठोकून राहतात? किती जनांना बूड टेकायला जमीन नाही? किती जन फुटपाथावर झोपतात? किती जन झोपडपट्टीत  राहतात? किती जन नगर पालिकेच्या गटारी उपसतात? रेल्वे रुळावरची घान साफ करतात? किती बायका रस्ते झाडतात? किती जन सुलभ शौचालयं चालवतात? किती जन डोक्यावरून मैला वाहतात? यांचं आरक्षण तुमच्या डोळ्यात खुपते ना? मग घ्या आरक्षण आणि करा ना ही कामं ! आम्हीही आरक्षण सोडायला तयार आहोत. फक्त जमीनीचं आणि संपत्तीचं एकदा समान पूनर्वाटप करा. आहे हिंम्मत? 

तुम्हाला ॲट्रोसिटीचाही  भयंकर त्रास होतो म्हणे! मग संपवून टाका ना जातीयता. गावकुसाबाहेरच्यांना गावात घ्या. महारा मांगाला पोरी द्या. भिला, भंग्याच्या पोरी घ्या. पारध्या, कातकर्याला शेजार द्या. कोणाही दलितावर बहिष्कार टाकू नका.जातीवरून हिनवू नका, शिवीगाळ करू नका.  आम्ही स्वत: हून  ॲट्रोसिटी रद्द करण्याची मागणी करू. आम्हाला काय जातीची हौस नाही. 

आमच्या बाया तुम्ही वाड्यावर बोलावल्या, शेरपसा धान्याच्या बदल्यात वाटेल तेंव्हा भोगल्या. कोरभर भाकरीची लालूच दाखवून रक्त आटेस्तोवर कामं करून घेतली. मजुरीला बोलावून शेतावाडीत गाठून देहाचे लचके तोडले. एखादीनं विरोध केला तर सार्या गावा देखत नग्न धिंडी काढल्या. त्या सर्व आमच्या आया बहिणी होत्या. तेंव्हा आम्हाला काहीच वाटलं नसेल? आणि आज पहिल्यांदा कोण्यातरी पशुने तुमच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून तुम्ही पेटून उठलात. आरोपीला भरचौकात फासी द्या, दलित म्हणून समर्थन करणाराच्या तोंडात गू घाला. आमचं काहीच म्हणनं नाही. पण यासाठी सगळ्या दलितांना वेठीस धरण्याचे कारण नाही. लाखोंचे मोर्चे काढून वचक बसवण्याचा, ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका.

आमचा आणि ब्राम्हणाचा संबंध १४ ऑक्टोबर १९५६ पासूनच संपला. ते आमच्या दारात येत नाहीत आणि आम्ही त्यांच्या दारात जात नाही. आमचं शोषण ब्राम्हणांनी नाही, तुम्ही केलं. आमच्यावर जातीय अत्याचार ब्राम्हणांनी नाही, तुम्ही केलेत. खैरलांजी, सोनई, खेर्डा, शिर्डी तुम्ही घडवलं ब्राम्हणांनी नाही. आमच्यावर बहिष्कार तुम्ही टाकला,आम्हाला  गावबंदी तुम्ही केली आणि बोट मात्र ब्राम्हणाकडे दाखवता. नुस्त्या ब्राम्हणांना शिव्या देवून पुरोगामी बनता येत नसते  मराठ्यांनो! त्यासाठी आपल्याच जातीतील जातीयवाद्यांविरोधात उभे रहावे लागते. राहताल उभे? आहे हिंम्मत? जाती साठी माती खाणारे लाख भेटतील, पण अखील माणसासाठी मातीत उतरणारा एखादाच शिवाजी, शाहू, सयाजी, भाऊराव, कॉ. शरद् पाटील, आ. ह. साळूंखे, मा. मो. देशमुख असतो आणि तो लाखाच्या बरोबरीचा असतो यांनाच म्हणतात एक मराठा लाख मराठा!                                              *विजय तारा नामदेव*

1 टिप्पणी:

  1. मराठा समाजाला दोष देणार का? आम्हाला आरक्षण पाहिजे कारण 80% भेटुन सुध्दा अॅडमीशन होत नाही.आणि हा आम्ही कोणाचेही आरक्षण काढुन आम्हाला द्या अस आम्ही म्हणत नाही.पण विनाकारण मराठा समाजाला वाईट दाखवल जात.आम्हाला आरक्षण पाहिजे कारण ते आरक्षण सोडायला कोणी मागत नाही आहे.तुम्ही आरक्षण सोडा आम्हाला नको आरक्षण.आणि हा मराठा समाज हा एकटा जातीवादी नाही बर का SC ST व OBC मध्ये सुध्दा आपल्या मुली पर जातीला देत नाही आपल्या जातीचा बघतात पहील तुम्ही करा जाती जाती मध्ये लग्न मग आम्हाला शिकवा.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करायची हिम्मत कशी झाली तुझी.तुमच्या खोटया लेखा आता कोणी बळी पडणार नाही.

    उत्तर द्याहटवा