शनिवार, १७ जानेवारी, २०१५

अभ्यास म्हणजे काय?

अभ्यास करताना उपयुक्त ठरणाऱ्या अभिनव तंत्रांविषयी.. आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अभ्यासाची काही तंत्रं आपण या सदरातून जाणून घेणार आहोत. अभ्यास हा विषयच असा आहे की याचा अभ्यास निरंतर. सुरू आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी, गुरूंपासून आजचे वैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यावर सतत संशोधन, मनन, चिंतन करत आहेत. ही सारी धडपड आहे यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होण्यासाठी. 'यश' म्हणजे काय? त्याचे आयाम कोणते, मोजपट्टी कोणती याची परिभाषा कदाचित भिन्न असू शकेल. पण प्रत्येकाला आपण जिथे, जसे आहोत तिथून थोडं उन्नत स्थानी जायचं असतं. सतत काही नवं हवं असतं. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यभराचा विद्यार्थीच असतो. अगदी इवलासा जीव पृथ्वीवर अवतरल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत. एवढंच काय, औपचारिक व अनौपचारिकरीत्या आपली शिकण्याची धडपड सुरूच असते. एकाचवेळी कितीतरी गोष्टी आपल्याही कळत-नकळत आपण शिकत असतो. आपण काहीतरी ऐकतो, पाहतो, अनुभवतो मग लगेच ती माहिती मेंदूकडे पाठवली जाते. आपला मेंदू अगदी सुपर कॉम्प्युटरपेक्षाही वेगानं कार्य करत असतो. तो ताबडतोब नवी मिळालेली माहिती त्याच्याकडे असलेल्या माहितीशी ताडून बघतो. कधी तुलना करतो, निष्कर्ष काढतो, नियम बनवतो इत्यादी. नको असलेली माहिती बाजूला सारतो. काहीवेळा आपणच त्याला सूचना देतो 'याची गरज नाही' किंवा त्या माहितीचा वापर करत नाही. मग ती माहिती अडगळीच्या सामानासारखी पडून राहते. कायमची पुसली मात्र जात नाही. आण मग वेळ येताच त्या माहितीचा त्या त्या काळ, वेळ, प्रसंगानुसार आपण वापर करतो. ज्याला अचूक वापराचे तंत्र कळले तो परीक्षेत आणि एकूण आयुष्यात यशस्वी होतो. आपल्यापैकी प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. म्हणूनच ही सारी प्रक्रिया आणि तिचा परिणामकारक वापर आपण जाणून घेऊ या. खरं तर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एप्रिल-मे पासून हा विषय क्रमवार मांडायला हवा. म्हणजे असे की- * अभ्यास म्हणजे काय? प्रत्येक विषय आपल्या मेंदूच्या, व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूंना आकार देतो? * स्वयंअध्ययन- म्हणजेच स्वत:चा स्वत: अभ्यास कसा करावा? * परीक्षेच्या अभ्यासाबरोबर इतर कोणत्या गोष्टी शिकाव्यात, ज्याचा अभ्यासातही उपयोग होऊ शकेल? * अभ्यासनीती म्हणजे काय? * अभ्यासाच्या चांगल्या सवयी-कोणत्या? त्या कशा लावून घ्याव्यात? चुकीच्या सवयींना रामराम कसा ठोकावा? * पाठांतर, मनन, चिंतन, एकाग्रता, वेळेचे नियोजन, उजळणी या सर्वाना म्हणतात अभ्यासतंत्रे. ती कशी आत्मसात करावी? त्यांचा वापर कसा करावा? * श्रवण, वाचन, संभाषण, लेखन ही झाली अभ्यास कौशल्ये. त्यात अधिक तज्ज्ञता कशी प्राप्त करता येईल? आपल्याकडे ती कितपत आहेत, हे कसे जोखावे? त्यांना अधिक धारदार कसे बनवता येईल? * अभ्यास करताना वा परीक्षा देताना कोणत्या समस्या जाणवतात? त्यांचं निराकरण कसं करता येईल? * या साऱ्या समस्यांना, अडथळ्यांना पार करत अंतिम परीक्षेला कसं सामोर जावं? जेणे करून अधिक ताण न येताही उत्तम यश मिळेल.. आता शाळा, महाविद्यालयातील सारी मौजमजा, स्पर्धा, उत्सव आटोपले आहेत. चोहो बाजूंनी एकच सूचना येते आहे- 'चला अभ्यासाला लागा.' परीक्षा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच पुढच्या भागापासून आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते आपण पाहू या. लोकसत्ता मुंबई, Learn इट, बुधवार, १४-०१-२०१५ लेखिकाः अनुराधा गोरे, लिंकः http://www.loksatta.com/learn-it-news/effective-study-techniques-1061103/

अस्खलित इंग्रजी यावे, म्हणून..

जागतिकीकरणाच्या युगात उत्तम इंग्रजी बोलता येणे महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य बनले आहे. इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणं आणि इंग्रजी लेखनकौशल्यात पारंगत असणं आज करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.. तसे म्हटले तर आपण सगळेच इंग्रजी भाषेशी परिचित आहोत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजातही आपण इंग्रजी वापरतो. आपल्यापकी अनेकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांतून शिक्षणही घेतलेले असेल. तरीही आयत्या वेळी इंग्रजीत संभाषण किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तर आपण कचरतो. इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे आवश्यक आहे.भाषिक अडचणीमुळे एखादी व्यक्ती अडखळत किंवा विचार करत बोलते. ऐकणाऱ्याचा असा समज होऊ शकतो की बोलणाऱ्या व्यक्तीला विषयाची आवश्यक तितकी माहिती नसल्यामुळे ती अडखळतेय. भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले, की आपल्या कार्यक्षमतेविषयीचे असे गरसमज टाळता येतात. मातृभाषेइतकेच सहज इंग्रजीतून बोलता आले पाहिजे. कोणतीही पूर्वतयारी किंवा जुळवाजुळव केल्याशिवाय उत्तम संभाषण करण्याएवढी भाषेवर पकड असायला हवी. ही प्रक्रिया थोडी कठीण वाटणे स्वाभाविक आहे. पण चिकाटीने रोज सराव केल्यास इंग्रजी भाषाकौशल्य नक्की सुधारता येते. इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज करता येण्याजोग्या काही गोष्टी- भाषेच्या सतत संपर्कात राहा एखाद्या भाषेच्या सतत व अधिकाधिक संपर्कात राहिले की ती शिकणे अधिक सोपे बनते. पण आपण नेमके उलट वागतो. सहसा आपण कठीण वाटणारी गोष्ट टाळतो. इंग्रजी भाषेच्या सतत सहवासात राहा. दिवसभर इंग्रजी कानावर पडू द्या. इंग्रजी वृत्तपत्रे वाचा, इंग्रजी गाणी ऐका, चांगल्या इंग्रजी मालिका व चित्रपट पाहा. जितकी भाषेशी अधिक ओळख होईल, तितक्या लवकर तिच्याशी घनिष्ठ मत्री जमेल. लेखन 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' याप्रमाणे रोज निदान चार-पाच ओळी तरी इंग्रजीमध्ये लिहा, मग ती कामांची यादी असो, फेसबुक अपडेट असो अथवा सहकाऱ्याकरिता ठेवलेला एखादा निरोप. इंग्रजीमध्ये डायरी किंवा ब्लॉग लिहा. लिहिताना व्यवस्थित विचार करून वाक्यरचना करता येते आणि मग सरावाने ती बोलण्यातही उतरते. आत्मविश्वास बाळगा भाषा शिकताना चुका होणारच. अशा चुकांमुळे इंग्रजी बोलण्याचे सोडून मात्र देऊ नका. 'इंग्लिश विंग्लिश'मधील अमिताभच्या पात्राने दिलेला कानमंत्र लक्षात ठेवा- 'बेशक बेफिकर बिनधास्त इंग्रजी बोला.' सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी एन्जॉय करा. नवीन भाषा शिकताना आपल्याला मिळतात नवे अनुभव, नवे विचार, एक नवी संस्कृती.. या नवीन दृष्टिकोनाचा आनंद घ्या. मग भाषा आत्मसात करणे एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रसरशीत जिवंत अनुभव होईल. वाचन वाढवा शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी आपण शब्दकोश उघडतो तर व्याकरणासाठी नियमावलीचा आधार घेतो. असे केल्यास इंग्रजी क्लिष्ट व असाध्य वाटू लागते. या दोन्हींसाठी सोपा मार्ग आहे वाचन. उत्तम इंग्रजी पुस्तके व लेख वाचल्यास उत्तम दर्जाची भाषा आत्मसात व्हायला मदत होते. मात्र, इंग्रजी पुस्तके वाचताना भाषेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. लेखकाने वापरलेले शब्द आणि वाक्यांची रचना लक्षात घ्या. चांगले शब्द / वाक्ये अधोरेखित करून पुन: पुन्हा वाचा. ती लक्षात ठेवून रोजच्या संभाषणात वापरण्याचा प्रयत्न करा. उदा. ‘I don’t think so.’ च्या ऐवजी I have a different opinion on this issue. वापरल्यास ते अधिक प्रभावी वाटेल. तसेच Wait a minute, I will answer you पेक्षा Could you put that question on hold for a minute?l म्हणणे सयुक्तिक ठरेल. वेळेअभावी आपण पुस्तके / वृत्तपत्रे वाचण्याचा कंटाळा करतो. इंटरनेट व मोबाइल फोन क्रांतीने ही तक्रारही नष्ट केली आहे. केव्हाही कुठेही थोडासा वेळ मिळाल्यास वाचन करणे सहज शक्य झाले आहे. चांगल्या नियतकालिकांच्या वेबसाइट्स तसेच विविध विषयांवरचे ब्लॉग्ज क्षणार्धात शोधता येतात. बसस्टॉपवरील १५ मिनिटे किंवा मीटिंग रद्द झाल्यामुळे मिळालेला अर्धा तास आता इंग्रजी वाचून सहज सत्कारणी लावता येईल.आपल्या क्षेत्राशी संबंधित लेख / ब्लॉग्ज वाचून भाषा तर सुधारतेच, त्याबरोबर व्यवसायातील नवीन घडामोडींची माहितीदेखील मिळते. ऐका व बोला चांगले इंग्रजी ऐका. उच्चारांकडे तसेच आवाजाच्या चढ-उताराकडे विशेष लक्ष द्या. स्वत: बोलताना या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करा. NatGeo किंवा History Channel वरच्या माहितीपटांचे निवेदन नियमित ऐका. इंटरनेटद्वारे विविध विषयांवर podcasts प्रसारित केले जातात. हे रेडिओसारखे केव्हाही ऐकता येतात. अधिकाधिक लोकांशी इंग्रजीमध्ये बोला. सुरुवातीला कधी योग्य शब्द सापडणार नाहीत तर कधी व्याकरणाच्या चुका होतील. तरीही इंग्रजी बोलत राहा. सतत सराव केल्याने आत्मविश्वास वाढेल व बोलणे अधिक सहज होईल. इंग्रजी बोलताना इंग्रजीमध्येच विचार करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपण मराठीत वाक्य योजून त्याचे शब्दश: भाषांतर करतो. मग She is angry WITH me ऐवजी आपण She is angry ON me म्हणतो तर कधी उंल्ल Can you click a photo of us? च्या जागी Can you remove a photo of us? वापरतो. दोन्ही भाषांची वाक्यरचना वेगळी असल्याने अर्थाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. शब्दसंपत्ती वाढवा 'अस्खलित संभाषण करण्यासाठी सर्वप्रथम योग्य शब्द माहिती असायला हवेत. याकरिता शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे. इंग्लिशमध्ये दीड लाखांहून अधिक शब्द आहेत व दर वर्षी काही नवीन शब्द भाषेत समाविष्ट केले जातात. आपण मात्र आपली शब्दसंपत्ती वाढवताना आपल्या करिअरच्या गरजेवर लक्ष केंद्रित करावे. आपल्या क्षेत्रात नेहमी वापरायला आवश्यक असे अधिकाधिक शब्द आत्मसात करावेत. 'अनेकदा दोन शब्द एकसारखे असल्याने गोंधळ निर्माण करतात. उदा.Respective (अनुक्रमे) व Respected (आदरणीय) किंवा Accept (स्वीकारणे) व Except (वगळता) अशा शब्दांच्या योग्य वापराकडे विशेष लक्ष द्या. 'रोज किमान पाच नवीन शब्द शिका. त्यांचा अर्थ समजावून घ्या व ते वाक्यात वापरण्याचा प्रयत्न करा. केवळ शब्द व अर्थाचे पाठांतर फारसे उपयोगी पडत नाही. 'फ्लॅशकार्ड्स वापरल्यास नवीन शब्द शिकणे खूप सोपे होऊन जाते. हल्ली तर ही फ्लॅशकार्ड्स ंस्र्स्र् च्या स्वरूपातही उपलब्ध आहेत. काही apps मोबाइल फोन / लॅपटॉपच्या screensaver वर नवीन शब्द अर्थासहित दाखवत राहतात. कळत-नकळत हे शब्द आपल्या ओळखीचे होऊन जातात. Visual Thesaurus हे नवीन शब्द शिकण्यासाठी एक सोपे Word games किंवा शाब्दिक खेळांचे अनेक apps मोबाइल फोनवर मोफत उपलब्ध आहेत. फावल्या वेळात कॅण्डी क्रशच्या स्कोअरबरोबरच शब्दसंपत्ती वाढवायला काहीच हरकत नाही. इंग्लिशमध्ये प्रत्येक बारीकसारीक अर्थासाठी चपखल योजता येतील असे अनेक शब्द आहेत, मात्र ते वापरात आणले पाहिजेत. एखादे गाणे, एखादी डिश किंवा एखादा गमतीदार किस्सा आवडला की आपण पटकन Awesome अशी प्रतिक्रिया देतो. गाण्याला delicious व गमतीला humorous म्हणून पाहा, चपखल शब्द वापरण्याची मजा काही औरच आहे. लोकसत्ता मुंबई, Learn इट, बुधवार, १४-०१-२०१५ लेखिकाः गायत्री गाडगीळ विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, डी. जी. रूपारेल महाविद्यालय, माटुंगा लिंकः http://www.loksatta.com/learn-it-news/how-to-speak-fluent-english-1061108/

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती स्त्रीचं पुढे जात राहणं आता अपरिहार्य आहे. पण या मार्गावर विकृती, हिंसा, शोषण दबा धरून बसलेले आहेत. त्या सगळ्यातून वाचत, वाचवत आपला मार्ग सुकर करायचा असेल तर प्रत्येक तरुणीने, स्त्रीनेच खंबीर, सजग व्हायला हवं. पोलिसांच्या यंत्रणांचा यथायोग्य वापर करीत स्वत:ला सुसज्ज बनवत तिने स्वत:भोवतीचं असुरक्षेचं चक्र भेदायचं आहे. नव्या वर्षांत हा संकल्प करायलाच हवा. स्वत:साठी आणि स्त्रीवर्गासाठीही.. घरबसल्या अशी करावी तक्रार प्रत्येक शहराच्या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाइट्स (संकेतस्थळे) आहेत. त्यावर सर्वाचे ई-मेल्स, फोन नंबर्स असतात, तक्रारीचा अर्ज असतो. पण कोणीही त्या मुद्दाम शोधून काढायच्या भानगडीत सहसा पडत नाही आणि या सुविधेपासून आपण वंचित राहतो. अशी संकेतस्थळे शोधणे कठीण नाही. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, आपल्याला मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर जायचे आहे, मग ते शोधायचे कसे.. ही पद्धत अतिशय सोपी आहे. गुगल सर्चवर जाऊन मुंबई पोलीस (mumbaipolice ) असे टाइप केले की मुंबई पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ समोर येईल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या शहराच्या, जिल्ह्य़ातील पोलिसांचे संकेतस्थळ शोधू शकता. या संकेतस्थळावर पोलीस महासंचालकांपासून त्या त्या शहरातील पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्रमांक आणि ई-मेल दिलेले असतात. या ई-मेलवर काही पाठवले तर कोण दखल घेणार, कोण वाचणार, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एक छोटेसे उदाहरण. काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय असा मेल मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवला. घरात बसल्या बसल्या त्याने मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ उघडले आणि आयुक्तांना मेल केला. मित्रांना कळवलं तर ते मन परावृत्त करायला येतील, अशी त्याला भीती होती. पण हा मेल पोलीस आयुक्तांनी वाचला. त्वरित सायबर सेल विभागाला या तरुणाला शोधून त्याला थांबविण्याचे आदेश दिले. काही तासांतच पोलीस त्याच्या घरात पोहोचले आणि त्याला आत्महत्येपासून रोखले. अलीकडे स्त्रियांना भेडसावणारा त्रास सायबरसंबंधातील गुन्ह्य़ांचा असतो. इंटरनेटवर अश्लील फोटो बनवून टाकणं, अनोळखी मोबाइल क्रमांकातून अश्लील मेसेजेस पाठवणं, असे अनेक प्रकार केले जातात. हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्य़ात मोडतात. त्यामुळे अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे कराव्यात. मुंबईत वांद्रे येथील बीकेसीमध्ये स्वतंत्र सायबर सेल पोलीस ठाणे आहे, तर पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयात (क्रॉफर्ड मार्केट) गुन्हे शाखेची सायबर सेल शाखा आहे. याशिवाय आपण त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ासंबंधातील तक्रारी नोंदवू शकतोच. एकटय़ाने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी मुंबई पोलिसांनी ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस सेवा सुरू केली आहे. टॅक्सी, रिक्षात बसल्यावर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाइल नंबरवर फक्त एसएमएस करायचा. हा मोबाइल जीपीएस प्रणालीवर काम करतो. जेणेकरून तुमच्या प्रवासस्थानाची नियंत्रण कक्षात नोंद राहते. रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा पकडताना स्थानकाबाहेरच्या स्टँडवरूनच पकडावी. मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री बारानंतर टॅक्सी, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नोंद ठेवली जाते. टॅक्सीप्रवासादरम्यान कुठलीही तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ०२२-२४९३९७१७ या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर किंवा ८८७९ २२ ११०० या हेल्पलाइनवर संपर्क करावा. जेणेकरून त्यावर भाडे नाकारणे किंवा इतर कारवाई होऊ शकते. आपल्या आजूबाजूला, किंवा ट्रेनमध्येही असं काही चित्रण होत नाही ना, यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. असं कुणी आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वे पोलिसांकडे करू शकता किंवा हेल्पलाइन वर संपर्क साधू शकता.) (GRP -९६६२५००५०० RPF ९००३१६१७०) स्त्रियांना कुठल्याही प्रकारणी तक्रार करायची असल्यास १०० (राज्यात सर्वत्र)आणि १०३ (फक्त मुंबईपुरता)हे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. संकटकाळी या क्रमांकांवर संपर्क केल्यास अवघ्या ५ ते १० मिनिटांत मदत पोहोचू शकते. हे झालं आपत्कालीन परिस्थितीत. पण जर एखाद्या गुन्ह्य़ाची तक्रार करायची असेल तर आता पोलीस ठाण्यातही जायची गरज नाही. एक फोन केला तरी महिला पोलीस (साध्या वेषात) घरी येऊन तक्रार नोंदवून घेतात. जर आपल्या सभोवताली एखादा गैरप्रकार सुरू असेल त्याची माहिती द्यायची असेल आणि आपलं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ७७३८ १३३ १३३ किंवा ७७३८ १४४ १४४ या क्रमांकांवर फक्त एसएमएस करायचा. प्रत्येकीच्या हातात मोबाइल फोन, स्मार्टफोन असतो. त्यात हजारो क्रमांक असतात. त्यात या सर्व हेल्पलाइन क्रमांकांची नोंद करून ठेवायला हवी. आपण कुठे राहतो त्या विभागाचे पोलीस ठाण्याचे क्रमांक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा क्रमांक, पोलीस उपायुक्तांचा क्रमांक, माहिती करून तो मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवायला हवा. काही वेळा लोकल ट्रेनमध्ये काही वस्तू विसरल्या जातात. त्यासाठी रेल्वेच्या ९८३३३३ ११११ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला तर आपली हरवलेली वस्तू परत मिळण्यास मदत होते. प्रत्येक रेल्वे स्थानकात हेल्पलाइनची स्वतंत्र टेलिफोन सेवा आहे. आपण ज्या गाडीत होतो त्या गाडीची वेळ सांगितली की पुढील स्थानकात गाडीतून ती वस्तू शोधून काढली जाते. लोकसत्ता मुंबई, चतुरंग, शनिवार, १०-०१-२०१५ लेखकः श्री. सुहास बिऱ्हाडे लिंकः http://www.loksatta.com/chaturang-news/women-wants-to-break-wheel-of-insecurity-1059201/2/#

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांचेकडुन सर्व समाजासाठी ऑनलाईन(ईमेलद्वारे) मोफत पुरविल्या जाणारया सेवा

बुधवार, २६ मार्च, २०१४

अवयव दान महादान/A SECOND LEASE OF LIFE झोनल ट्रान्सप्लांन्ट को ऑर्डिनेशन सेंटर, एल.टि.एम.जी.हॉस्पिटल, कॉलेज बिल्डिंग, १ ला मजला, रुम नं. २९ ए, स्किन बँकेजवळ, सायन(प), मुंबई ४०००२२, Website:www.ztccmumbai.org, Email ID: ztccinmumbai@hotmail.com, संपर्कः सौ. सुजाता अष्टेकर, भ्रमणध्वनी क्र. ९८२०३९६७१७ Zonal Transplant Co Ordination Center, LTMG Hospital, College Building, 1st Floor, Room No. 29/A, Near Skin Bank, Sion(W), Mumbai 400022, Website: www.ztccmumbai.org, Email ID: ztccinmumbai@hotmail.com, Contact Person: Mrs. Sujata Ashtekar, Mobile No. 9820396717.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांची दिनांक २०-०५-२०१६ रोजी अध्यतनित केलेली वैयक्तिक माहिती

  1. वडिलांचे नाव: स्वातंत्र्यसैनिक व दलित मित्र श्री. नामदेवराव गिरजाप्पा व्हटकर
  2. आईचे नाव: सौ. सुभद्रा(गृहिणी)
  3. जन्म तारीख: ११ ऑक्टोबर १९५४(कागदोपत्री २० ऑक्टोबर १९५४)
  4.  जन्म गाव: मु.पो.उपळे(माकडाचे), ता.व जि. उस्मानाबाद पिन ४१३५०१, महाराष्ट्र 
  5. विवाहाची तारीख: २९ नोव्हेंबर १९८१. 
  6. पत्नीचे नाव: सौ.शारदा - शिक्षिका(सेवानिवृत्त)बृहन्मुंबई महानगर पालिकेतून. 
  7.  अपत्ते: दोन पुत्र १) श्री. उन्मेष – बी.ई.(कॉम्प्युटर), एम.एम.एस.(फायनान्स) – विवाहीत व ग्रेटर नॉयडा येथे खाजगी नोकरी  २) श्री. आशिष – बी.ई.(ईलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम्युनिकेशन्स),एम.एम.एस(ऑपरेशन्स) - विवाहीत व मुंबईत खाजगी नोकरी 
  8. शिक्षण: १)बी.एस.सी.(ऑनर्स)(केमेस्ट्री), १९७६,(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र) २)एम.एस.डब्ल्यु.(लेबर वेल्फेअर व पर्सोनेल मॅनेजमेंट), १९७८, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र) ३) महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(एमएस-सीआयटी) हा कोर्स जुलै २०११ मध्ये, माझ्या वयाच्या ५७ व्या वर्षी ८६% मार्क मिळवुन पुर्ण केला. 
  9. भाषेवरती प्रभुत्व: मराठी, इंग्लीश व हिंदी 
  10. सवयी: निर्व्यसनी 
  11. पूर्वी केलेल्या नोकरया: १) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी(मॅनेजमेंट ट्रेनी) – ऑक्टोबर १९७८ ते सप्टेंबर १९८०) – हिंदुस्तान ऑर्ग्यनिक केमिकल्स लि.(भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय) – रसायनी, जि. रायगड, महाराष्ट्र – राजीनामा २) अ) व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) – (ऑक्टोबर १९८० ते जुलै १९९६) २) ब) वरिष्ठ व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) – (जुलै १९९६ ते सप्टेंबर २००१) – मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि.( भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय) – मुंबई , नवी दिल्ली, उज्जैन व इंदोर(मध्य प्रदेश) व अहमदाबाद(गुजरात) – स्वेच्छानिवृत्ति ३) मालमत्ता व्यवस्थापक(ईस्टेट मॅनेंजर)(डिसेंबर २००४ ते जून २००५) – (वसंत उत्सव सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कांदिवली(पूर्व), मुंबई – राजीनामा ४) कार्मिक व्यवस्थापक(पर्सोनेल मॅनेंजर)(जून २००५ ते ऑक्टोबर २००५) – आलानासन्स लि.,कुलाबा, मुंबई – राजीनामा ५) वरिष्ठ कार्यकारी(मानवी साधन व प्रशासन)(सिनियर एक्झीक्युटिव्ह(एचआर व अँडमिनीस्ट्रेशन) – (फेब्रुवारी २००६ ते ऑगस्ट २००६) – कॅपिटॉल इंडस्ट्रीज, गोरेगाव(पूर्व), मुंबई – राजीनामा 
  12. सध्याचा व्यवसायः समाजसेवक, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादि द्वारे वैयक्तिक संपर्क व फोनच्या माध्यमातुन विनामूल्य समाजकार्य, शेतकरी. 
  13.  ई-मेल पत्ताः vilassocialwork@gmail.com 
  14. ब्लॉगः http://vilasvhatkar.blogspot.com 
  15. सध्याचा निवासाचा व पत्रव्यवहाराचा पत्ताः १६०४, डायमंड आइल ३, रॉयल पाम्स, सर्व्हे नं. १६९, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव(पू), मुंबई – ४०००६५, महाराष्ट्र. 
  16. भ्रमणध्वनी क्र.- +९१९८६९३८८३०३ 
  17. नोकरीत असताना केलेले उल्लेखनीय कार्यः १) वयाच्या सव्वीसाव्या वर्षी व्यवस्थापक पदापासून कारकीर्दीला सुरुवात २) मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि., येथे वरिष्ठ व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) या पदावर कार्यरत असताना, कंपनीची दीड कोटी रुपयांची बचत केली. कंपनीने “चेअरमन्स अँवार्ड ऑफ एक्सलन्स” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले ३) राजभाषा हिंदीचा कार्यालयीन कामामध्ये परिणामकारक वापर केल्यामुळे अनेक पुरस्कार मिळाले ४) कंपन्यांच्या धोरणानुसार अनेक अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागास वर्गीय व गोरगरीब गरजु लोकांना नोकरीला लावले व पदोन्नत्या व अन्य लाभ दिले 
  18. नोकरीत असताना केलेले अन्य उल्लेखनीय कार्यः १) ऑल इंडिया एम.एफ.आय.एल. ऑफिसर्स फेडरेशन, कोचिन, केरळचे कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम केले २) मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि., मुंबई शाखेत एम.एफ.आय.एल. ऑफिसर्स असोसियेशन स्थापन करुन सचिव म्हणून काम केले ३) १९८५ साली चारकोप मॉडर्न सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, चारकोप, कांदिवली(प), मुंबई येथे स्थापन करुन मुख्यप्रवर्तक व मानद सचिव म्हणून काम केले. पारदर्शकरित्त्या काम करुन, सदर संस्थेची इमारत बांधून पुर्ण केली व फ्लॅटच्या माध्यमातुन बारा कुटुंबांच्या निवारयाचा व सहा दुकानें व एक कमर्शियल हॉलच्या माध्यमातुन सात कुटुंबांच्या रोजी-रोटीचा प्रश्र सोडविला ४) १९८७ साली चारकोप उत्कर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, चारकोप, कांदिवली(प), मुंबई येथे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करुन, फ्लॅटच्या माध्यमातुन बारा कुटुंबांच्या निवारयाचा व दहा दुकानांच्या माध्यमातुन दहा कुटुंबांच्या रोजी-रोटीचा प्रश्र सोडविला 
  19. स्वयंसेवी व अन्य संस्थांशी संबंधः १) इंडस्ट्रीयल रिलेशन्स इन्स्टीटयुट ऑफ इंडिया, मुंबईचे आजीव सदस्य २) संत कक्कय्या विकास संस्था, धारावी, मुंबईचे आजीव सदस्य ३) वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ, पुणेचे आजीव सदस्य ४) वीरशैव संत कक्कय्या समाज मंडळ, पिंपरी-चिंचवड, पुणेचे आजीव सदस्य ५) संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, पुणेचे माजी विश्वस्त ६) कै. सदगुरु श्री. वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन तत्वज्ञान, मुंबईचे नामधारक ७) हाय-टेक बृहन्मुंबई निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, मुंबई - मार्गदर्शक/सल्लागार ८) सखुमाई संभाजीराव शिंदे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित(नियोजित), सोलापूर - सदस्य व मार्गदर्शक/सल्लागार 
  20. आजपर्यंत केलेल्या समाजकार्याचा तपशिलः १) सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन ऑक्टोबर १९८० ते आजतागायत माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या १०% रक्कम मी गरजु गोरगरीबांसाठी खर्च केली आहे व या पुढेही खर्च करत राहणार आहे. २) नोकरीमध्ये असताना, सन १९८२-८३ मध्ये, संत कक्कय्या विकास संस्था, धारावी, मुंबई या अनुसूचित जातीपैकी ढोर/कक्कय्या समाजाच्या संस्थेस दहा हजार रुपयांची मदत केली. ३) इंटरनेट व संगणक हे कमी खर्चामध्ये शिघ्र गतीने जगभर लेखी पत्रव्यवहाराचे प्रभावी साधन असल्यामुळे मी, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(एमएस-सीआयटी) हा कोर्स जुलै २०११ मध्ये, माझ्या वयाच्या ५७ व्या वर्षी ८६% मार्क मिळवुन पुर्ण केला आहे व मी यामध्ये पारंगत असुन मी स्वतः मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ईमेल द्वारे पत्रव्यवहार करतो. मी इंटरनेटच्या माध्यमातुन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी विनामूल्य समाजकार्य करत आहे. दिनांक 20.05.2016 रोजी माझ्याकडे एकुण 1970 लोकांचे ईमेल आयडी आहेत, पैकी अनुसूचित जाती - ढोर/कक्कय्या समाजाच्या 1490 लोकांचे(343 स्त्री व 1147 पुरुष), चर्मकार/चांभार समाजाच्या 48 स्त्री-पुरुषांचे, बौद्ध/महार समाजाच्या 45 स्त्री-पुरुषांचे, मातंग/मांग समाजाच्या 4 स्त्री-पुरुषांचे, खाटीक समाजाच्या 1 पुरुषाचा, इतर मागास वर्गीय 5 व इतर सर्व वर्गातील मराठी भाषिक 315 स्त्री-पुरुषांचे व 62 अमराठी भाषिक स्त्री-पुरुषांचे ईमेल आयडी आहेत. तसेच 1080 लोकांचे व्हॉट्सअप मोबाईल नंबर व 853 फेसबुक मित्र आहेत व दिवसेंदिवस मी यामध्ये वाढ करत आहे. या यादिमध्ये खेडी, शहरे, तालुक्याची व जिल्ह्याची ठिकाणे, महानगरे, भारतातील राज्यांच्या राजधान्या व अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, सौदी अरेबिया येथील भारतीयांचा समावेश आहे. ४) समाजातील सर्व जाती धर्माच्या ८०००(आठ हजार) लोकांची वैयक्तिक माहिती जसे की, पूर्ण नांव, जन्म तारीख, उंची, रक्त गट व रक्तदान करण्याची इच्छा, विवाहाची तारीख, अपत्यांची संख्या, शिक्षण, धर्म, जात, शारिरीक व्यंग, राहण्याचा व जन्मगावचा पत्ता, नोकरी/व्यवसाय हुद्दा व त्याचा पत्ता, वैयक्तिक व कार्यालयाचा ब्लॉग/संकेतस्थळ, वार्षिक उत्पन्न, मोबाईल/दूरध्वनी क्र., ईमेल आयडी, व्यक्तिच्या समस्येचे स्वरुप, समाज उन्नतीसाठी काय केले पाहिजे व यासाठी माहिती देणारी व्यक्ति काय करु शकते वगैरे मी गोळा केली आहे. मी स्वतः त्याचे संगणकीकरण करत आहे. या माहितीचा वापर “आहे रे” व “नाही रे” व्यक्तिंची सांगड घालून गरजुचीं कामे विनामूल्य करण्यासाठी करत आहे. भविष्यामध्ये या माहितीच्या आधारावर शासकीय योजनांमध्ये सुधारणा व नवीन योजना शासनाला सुचवणार आहे. मी फोन/व्हॉटस अप/एसएमएस/ई-मेलच्या माध्यमातून या लोकांना वाढदिवसाच्या व विवाहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. ५) मी, महाराष्ट्र शासनाच्या व भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांची, स्वयंरोजगारांच्या संधींचीं, शासकीय/निमशासकीय व खाजगी नोकरयांच्या उपलब्धतेसंबंधी संकेतस्थळांची/जाहिरातींची/लिंक्सची माहिती यादितील लोकांपर्यंत मोफत पोहचवत असतो. नोकरीच्या शोधात असणारयांचे प्राप्त सी.व्ही/बायोडाटा सर्क्युलेट करत असतो. करियर गाईडन्स देवुन यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा तयारीसाठी प्रशिक्षण देणारया शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती लोकांना देत असतो. विवाहेच्छुक तरुण तरुणींना जीवनसाथी शोधण्यासाठी त्यांची प्रप्त माहिती सर्क्युलेट करत असतो. रक्तदान, नेत्रदान व देहदानासंबंधीचे कार्य करणारया व्यक्ति व संस्थांची माहिती सर्क्युलेट करत असतो. गंभीर आजार व मोठया शस्त्रक्रियांसाठी अर्थिक सहाय्य देणारया स्वयंसेवी संस्थांची नांवे, पत्ते, फोन नं., ईमेल आयडी व संकेतस्थळ इत्यादी माहिती सर्क्युलेट करत असतो. मानव जातीच्या कल्याणासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व मी इंटरनेटद्वारे, पत्राद्वारे, फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीद्वारे विनामूल्य करत असतो. हे काम करत असताना मला या कामातुन वेगळा आनंद व समाधान मिळत असते व हे काम मी अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे. 
  21. मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची वानगीदाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेतः (क) आरोग्यविषयक बाबी जसे की, शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता, दोन्ही मुत्रपिंडे निकामी झालेल्या व्यक्तिसाठी आर्थिक मदत इत्यादि केसेसमध्ये माझ्या ईमेल यादीमधिल लोकांना ईमेल पत्रा द्वारे आवाहन करत असतो व लोक पुढे येवुन मदत करतात. (क) (१) कु. सारिका प्रमोद शिंदे, वय २५ वर्ष, रा. ठि. मुंबई यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली आहेत. मी माझ्या वैयक्तिक संबंधातुन मे. आलाना सन्स, मुंबई यांचे धर्मादाय फंडातुन रु. ४००००/-(रु चाळीस हजार फक्त) चेकद्वारे सदर मुलीच्या उपचारासाठी मिळवून दिले आहेत. सदर मुलीचे वडील श्री. प्रमोद बाबुराव शिंदे असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८९२८९०३६६ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (क) (२) सौ. सुवर्णमाला भाग्यवान शिंदे, वय ५२ वर्षे, रा.ठि. सोलापूर यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली आहेत. मी स्वतः रु. ४०००/- (रु. चार हजार फक्त) माझ्या खिशातुन मदत केली आहे. तसेच आर्थिक मदतीसाठी मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवुन, सौदी अरेबियात नोकरी करत असलेले श्री. विजयसिंग रघुनाथ शिंदे यांनी रु. २०००/-(रु. दोन हजार फक्त), व डॉ. सौ. संगिता राजेश हसनाळे, मुंबई यांनी रु. १००००/-(रु. दहा हजार फक्त), कोअर बँकिंग प्रणाली द्वारे त्यांचे पती श्री. भाग्यवान कृष्णाजी शिंदे यांच्या, युनियन बँक ऑफ इंडिया, सोलापूर कँप, सोलापूरच्या बचत खाते क्र. ४१०३०२०१०५०३३९५ मध्ये जमा केले आहेत. अशाप्रकारे एकुण सोळा हजार रुपयाची मदत त्यांना मिळाली आहे. सदर महिलेचे पती श्री. भाग्यवान कृष्णाजी शिंदे यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्र. ९८५०५३२८९९ वरती संपर्क साधून या बाबतची सत्यता पडताळून पाहता येते. (क) (३) श्री, नितेश दशरथ खरटमोल, वय २३ वर्ष, राहणार मुंबईहे Severe Generalized Acute Polyradiculoneuropathy(AIDP) या रोगाने आजारी असुन, दिनांक २१-०९-२०१३ पासुन लिलावती हॉस्पिटल, वांद्रे(प), मुंबई येथे भरती असुन रु. २४ लाख खर्च अपेक्षित आहे. आर्थिक मदतीसाठी मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे आवाहन केले असता दानशूर व्यक्तिंनी त्यांचे वडील श्री. दशरथ निगोजी खरटमोल यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीया माहुल रोड ब्रँच, चेंबूर, मुंबई ४०००७४ बचत खाते क्रः ३३४९२६२०३३७ IFSCI CODE: SBIN0000564 मध्ये पैसे जमा केले आहेत. श्री, नितेश दशरथ खरटमोल यांचे चुलत भाऊ श्री. सुनिल गुंडप्पा खरटमोल यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. +९१८९७६१३२९३९ वर याची खात्री करता येते. (क) (४) श्री. संतोष सदाशिव मावरकर वय २६ वर्षे राहणार बँगलोर यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली आहेत. त्यांना अर्थिक मदत करण्यासाठीचे आवाहन मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे करुन श्री. मावरकर यांच्या कॅनरा बँक, देवराजीवनहळ्ळी, बंगलोर मधिल बचत खाते क्र. ४१९१०११११८८० मध्ये मदत जमा करण्याची विनंती केली आहे. (ख) आंतर-जातीय विवाह केलेल्या खालील जोडप्यांना मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिल्या जाणारया प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्याची माहिती देवुन लाभ घेण्यासाठी सुचविले आहेः (ख)(१) श्री व सौ. लक्ष्मण सत्यविजय गावकर, चारकोप, कांदिवली, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८६९५५४१३७ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (ख)(२) श्री व सौ. मारुती रामलिंग नारायणकर, चारकोप, कांदिवली, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८१९५००६९० असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (ग) मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत, भूमिहीन दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जातीच्या शेतमजूरास दिल्या जाणारया जमिनी बाबत माहिती देवुन लाभ घेण्यासाठी श्री. संभाजी राजाराम नारायणकर, पांगरी, ता.बार्शी, जि. सोलापूर यांना सुचविले आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९६८९२१३३२४ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (घ) मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे भारत सरकारकडुन कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणारया शिष्यवृत्तीसाठी श्री. निखिल दिलीप गायकवाड, कांदिवली(पू), मुंबई यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित अधिकारयाशी संपर्क साधून मदत केली. त्या विद्यार्थ्याचा भ्रमणध्वनी क्र. ९८२०९४७६६३ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (च) मी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब यांना दिनांक २३ ऑगस्ट, २०१२ चे ई-मेल व स्पीड पोस्ट पत्र पाठवून मागासवर्गीयांच्या योजनासाठी असणारया उत्पन्न मर्यादेत/अटित महागाईच्या प्रमाणात आपोआप वाढ करणारया फॉर्म्युल्याचा समावेश करण्याबाबत व दोन शासकीय कर्मचारयांच्या व त्यांच्या कार्यालयाच्या हमीबाबतच्या जाचक अटि काढून टाकण्याबाबत विनंती केली आहे. 
  22. कौतुक/कृतज्ञता/सत्कारः लाभार्थ्यांचे व जनतेचे कौतुकाचे व कृतज्ञतेचे ईमेल व फोन मला येत असतात व स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार करत असतात.
  23. APPRECIATION POSTS FROM READERS OF WHATSAPP POSTS OF MR VILAS N VHATKAR GOREGAON MUMBAI REGARDING JOBS AVAILABILITY
    1) DATE: 13-08-15: FROM  MR VINIT NARESH VARTAK, SAFALE, DIST. PALGHAR
    I got the job in the finitial technology
    Thanx for the help
    2) DATE: 22-09-15: FROM MR GAURAV DATTATRAY KULKARNI
    Thank you sir...  Thankx a lot..  Tumhi naukri sandarbhat det aslelya mahiti mule mala & maza friends la khupch fayda zala... 😊
    3) DATE: 23-09-15: FROM MR MAHENDRA BABURAO ASHTEKAR, KANDIVALI, MUMBAI
    Kharach Farach Chaan samaj seva kaka
    4) DATE: 24-09-15: FROM MR KESHAV DHONDIBA KAMBLE, JT. CEO (RETD.), KVIC, GOI, ANDHERI, MUMBAI
    Vilas Vhatkar ji is great strength to all unemployed youth who has taken a noble mission to provide right time very valuable information about career opportunities for sure candidates across the planet. He was very ideal Administrator in Govt of india. He deserves Maharastra Bhushan Award.
    5) DATE: 26-09-15: FROM MR NIVRUTTI PARAPPA KAWALE, LATUR, DIRECTOR(RETD), BURAU OF INDIAN STANDRDS (BIS):
    Yes. I endores K D KAMBLE
    6) DATE: 24-09-15: FROM MR SUNIL KAILAS KAMBLE, MANAGER, BPCL, CHEMBUR, MUMBAI
    Excellent service for society.
    7) DATE: 25-09-15: FROM MR YOGRAJ KASHINATH KATAKDHOND, DHARAVI, MUMBAI
    Khup chhan kam krtay tumhi.
    8) DATE: 25-09-15: FROM MR NIKHIL HIMALAYA SANKPAL, DAFALAPUR, DIST. SANGLI
    Absolutely deserves the award.
    9) DATE: 07-11-15: FROM MR RANDHIR K GAIKWAD,  CHEMBUR, MUMBAI
    Dear Sir,
    Very proud of you .... very much appreciate the work done by you for improving our samaj ... I pray to god to give a huge success for it.
    10) DATE: 08-11-15: FROM MRS SNEHA PANKAJ SHINDE, THANE
    Tumi khup changala kaam kartay kaka. Ambhinandan. Ani dhanywad.
    11) DATE: 08-11-15: FROM MR SHRIKANT KRISHNAKUMAR SADAPHULE, SOLAPUR
    💐 You are Great Sir..💐
    12) DATE: 08-11-15: FROM MR VILAS MADHUKAR GAIKWAD, GENERAL MANAGER, IDBI, KANDIVALI, MUMBAI
    Thank you very much sir. You are really great. 🙏🙏
    13) DATE: 08-11-15: FROM MR DEEPAK LAXMAN KHARATMAL, JALNA
    Congratulate sirji really u r the layeble of this honors
    14) DATE: 08-11-15: FROM MR GANESH HIRALAL KHARATMAL, VIRAR.
    🙏🏼🙏🏼👌🏽👌🏽very good saheb
    15) DATE: 07-12-15: FROM MR ANIL UKHARDU KAKDE, KALYAN
    व्हटकर साहेब तुमचे काम खूप छान आहे. तुमच्या अखंडपणे चालणाऱ्या कामामुळे मी देखिल प्रभावित आहे.
    16) DATE: 20-01-16: FROM DR RAMESH MAHADEO KADAM, BELGAUM
    Very good information sir
    17) DATE: 20-01-16: FROM MR BHIMASHANKAR DHONDIRAM CHOUGULE, GOREGAON, MUMBAI
    Great Sir...!!!
    18) DATE: 22-01-16: FROM MR DAGDU AGANAPPA KHANDARE, KALWA, DIST. THANE THROUGH FACEBOOK:
    This is a great job and real social work to be appreciated by everyone.
    19) DATE: 07-02-16: FROM ADV MR SHRIGANESH SALBA SAWALKAR, LATUR:
    Sir your mission is great 💐💐💐💐
    20) DATE: 01-04-16: FROM MR DAYANAND SURESH TRIMUKHE, ENGINEER, MCGM, MUMBAI:
    Hi Sir, Thank you for sending valuable information regarding employment. Your work of creating awareness of job opportunities among the society has been incredible. I am sure many have benefited from it. I wish to receive such information so that I can forward it to necessitous. Thanks.
    21) DATE: 19-05-16: FROM MR KIRAN POPAT SHINDE THROUGH EMAIL:
    आताच आपला ब्लॉग वाचला. खूप छान काम केले आहे. एक समाज बांधव म्हणून आपला अभिमान वाटला. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.